मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  दोन बायका फजिती ऐका.. दोन पत्नींमध्ये पतीची वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहण्याचे आदेश, अन् रविवारी..

दोन बायका फजिती ऐका.. दोन पत्नींमध्ये पतीची वाटणी, दोघींकडे ३-३ दिवस राहण्याचे आदेश, अन् रविवारी..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 15, 2023 12:08 AM IST

Husband Wife Dispute : ग्वाल्हेर कौटुंबिक न्यायालयाने एका पतीचीदोन पत्नींमध्येवाटणी केली आहे.पती पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून३दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबतपुढचे३दिवसराहणार आहे.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

आत्तापर्यंत तुम्ही कुटुंबांमध्ये जमीन-जुमला, घर व दाग-दागिन्यांची वाटणी झाल्याचे ऐकले असेल. मात्र ग्वाल्हेरमधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. ग्वाल्हेर कौटुंबिक न्यायालयाने एका पतीची दोन पत्नींमध्ये वाटणी केली आहे. पती पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत पुढचे ३ दिवस राहणार आहे. तसा आदेश न्यायालयाचा आहे. मात्र, रविवारी पतीला दोन पत्नींपैकी कोणत्या पत्नीसोबत राहायचे आहे, याचा निर्णय स्वत: घेणार आहे. 

काय आहे प्रकरण -

वास्तविक, नवरा हरियाणातील एका बहुराष्ट्रीय कंपनीत इंजिनिअर पदावर कार्यरत आहे. त्याचे पहिले लग्न २०१८ मध्ये झाले होते आणि लग्नानंतर ते दोन वर्षे एकत्र राहिले. मात्र २०२०  मध्ये, जेव्हा कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा पतीने पत्नीला ग्वाल्हेर येथे तिच्या माहेरी सोडले आणि नंतर पुन्हा हरियाणाला परतला. लॉकडाऊन उठल्यानंतरही तो पत्नीला घ्यायला आला नाही. दरम्यान, याच कंपनीत काम करणाऱ्या दुसऱ्या महिलेसोबत पतीचे संबंध जुळले व त्यानंतर त्याने तिच्याशी दुसरे लग्न केले.

ग्वाल्हेर येथील आपल्या माहेरच्या घरी पतीची वाट पाहणाऱ्या पहिल्या पत्नीचा संयम सुटला व ती स्वत: पतीच्या कंपनीत पोहोचली. जिथे तिला कळले की तिच्या पतीने त्याच कंपनीत काम करणाऱ्या महिलेसोबत दुसरे लग्न केले आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि वाद झाल्यानंतर पत्नीने ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयात याबाबत तक्रार दाखल केली. पतीने दुसरं लग्न केलं आहे व तिला उदरनिर्वाहासाठी न्याय हवा, अशी तक्रार तिने न्यायालयात केली. त्यानंतर हे प्रकरण कुटुंब न्यायालयात समुपदेशक हरीश दिवाण यांच्यापर्यंत पोहोचले, त्यानंतर त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

सहा महिने चालला खटला -

समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितले की, महिलेच्या पतीशी त्यांचे बोलणे झाले आणि त्यानंतर जवळपास ६ महिने हे प्रकरण असेच चालू राहिले. त्यानंतर दोन्ही पत्नी आणि त्यांच्या पतीला समुपदेशनासाठी कौटुंबिक न्यायालयात बोलावण्यात आले आणि तिघांनाही बसवून चर्चा केल्यावर तोडगा निघाला. समुपदेशनाच्या माध्यमातून पतीने पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत ३ दिवस राहण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र रविवारी पती पूर्णपणे मोकळा असेल. त्या दिवशी तो त्याच्या इच्छेनुसार कोणत्याही पत्नीसोबत राहू शकतो. या निर्णयानंतर दोन पत्नी आणि पती तिघेही समाधानी असल्याचे समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितले. या करारासोबतच पतीने दोन्ही पत्नींना प्रत्येकी एक फ्लॅटही दिला असून तो स्वत: या दोघींची देखभाल करणार आहे.

IPL_Entry_Point