Viral News : आत्तापर्यंत तुम्ही कुटुंबांमध्ये जमीन-जुमला, घर व दाग-दागिन्यांची वाटणी झाल्याचे ऐकले असेल. मात्र बिहार राज्याच्या पूर्णिया जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका पतीची दोन पत्नींमध्ये वाटणी केली आहे. पती पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून ३ दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत पुढचे ३ दिवस राहत असून रविवारी पतीला दोन पत्नींपैकी कोणत्या पत्नीसोबत राहायचे किंवा सुट्टी घ्यायचा अधिकार देण्यात आला आहे.
बिहारमध्ये एका व्यक्तीने पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दोन विवाह केले. आता या गोंधळानंतर पतीची विभागणी करण्यात आली आहे. आठवड्यातील सात दिवसांमध्ये त्याची विभागणी करण्यात आली आहे. या ड्यूटीतून त्याला एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी पोलिस फॅमिली कौन्सिलिंग सेंटरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. वास्तविक या केंद्रात पती-पत्नीमधील किरकोळ वाद मिटवले जातात. एका महिलेने जिल्ह्याचे एसपी कार्तिकेय शर्मा यांना अर्ज देऊन पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.
महिलेने तक्रारीत म्हटले होते की, तिचा पती तिला घटस्फोट न देता दुसऱ्या पत्नीसोबत राहत होता. हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याने हे प्रकरण पोलिसांनी कुटुंब समुपदेशन केंद्राकडे पाठवले.
त्यानंतर वाद मिटवण्यासाठी पीडित पत्नीला व तिच्या पतीला या केंद्रात बोलावण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समुपदेशन केंद्रात पती-पत्नी दोघेही उपस्थित होते. महिलेचा आरोप आहे की, तिचा पती गेल्या सात वर्षांपासून तिला घटस्फोट न देता दुसऱ्या महिलेसोबत राहत होता आणि त्याने त्या महिलेशी लग्नही केले आहे. तिच्या पतीला पहिल्या पत्नीपासून दोन मुलेही आहेत.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस कुटुंब समुपदेशन केंद्रातील सदस्यही आश्चर्यचकित झाले. पती आपल्या आणि मुलांच्या पालनपोषणासाठी पैसेही देत नाही, असा आरोप पहिल्या पत्नीने केला आहे. या प्रकरणी समुपदेशन केंद्रातील न्यायाधीशांनी पतीच्या दुसऱ्या पत्नीलाही जोरदार फटकारले. त्याची दुसरी पत्नी त्याला पहिल्या पत्नीकडे जाऊ देत नाही, अशी बाजू पतीने कोर्टात मांडली. पत्नीला दुसऱ्या पत्नीपासूनही मुले आहेत.
पहिली पत्नी असूनही दुसऱ्या महिलेशी लग्न केल्याने तरुणाला आता तुरुंगात जावे लागणार असल्याचे समुपदेशन केंद्रातील न्यायाधीशांनी सांगितले. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही महिलांमध्ये भांडण सुरू झाले. अखेर समुपदेशन केंद्राने निर्णय घेतला की, पती आपल्या पहिल्या पत्नीसोबत आठवड्यातून तीन दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत आठवड्यातून तीन दिवस राहील. याशिवाय एक दिवस नवरा स्वत:च्या मर्जीने ज्या पत्नी सोबत त्याला राहायचे आहे तिच्या सोबत राहू शकतो. हा सगळा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच सोशल मिडियावर देखील व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या