१० ते १२ महिलांचा बदलला धर्म; नंतर सर्वांशी केलं लग्न, सुनेचाही छळ, पतीविरोधात महिलेची तक्रार-husband convert 12 women religion married everyone wife reached police station with complaint ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  १० ते १२ महिलांचा बदलला धर्म; नंतर सर्वांशी केलं लग्न, सुनेचाही छळ, पतीविरोधात महिलेची तक्रार

१० ते १२ महिलांचा बदलला धर्म; नंतर सर्वांशी केलं लग्न, सुनेचाही छळ, पतीविरोधात महिलेची तक्रार

Oct 02, 2024 12:03 AM IST

महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिचे फिरोजसोबत १९९२ मध्ये लग्न झाले होते. ती त्याची दुसरी पत्नी होती. तिच्या पतीच्या घरी चार बायका आहेत. पतीने आतापर्यंत १० ते १२ महिलांचे धर्मांतर करून लग्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पतीविरोधात महिलेची तक्रार
पतीविरोधात महिलेची तक्रार

झारखंडमधील एक महिला आपल्या पतीची तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचली. रांचीच्या बरियातू सत्तार कॉलनीत राहणाऱ्या पॉलिना हेमरोम यांनी पती फिरोज आलम याच्यावर धर्मांतर, जातीवाचक शिवीगाळ आणि छळ करून तिला घराबाहेर काढल्याचा आरोप केला आहे. आपल्या पतीने १० ते १२ महिलांचे धर्मांतर केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पीडितेने पती फिरोज आलम, वहिनी शहनाज खातून आणि निकहत परवीन आणि रहनुमा खातून यांच्या विरोधात एसटी-एससी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पीडितीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, सून आणि नातवंडांच्या कल्याणासाठी ती २८ सप्टेंबर रोजी पतीकडे गेली होती. आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर भीतीपोटी ती तिथून पळून गेली.

महिलेने तक्रारीत म्हटले आहे की, तिचे फिरोजसोबत १९९२ मध्ये लग्न झाले होते. ती त्याची दुसरी पत्नी होती. तिच्या पतीच्या घरी चार बायका आहेत. पतीने आतापर्यंत १० ते १२ महिलांचे धर्मांतर करून लग्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तिच्या पतीनेही अनेकदा तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. लग्नानंतर पतीसह सासरचे लोक त्यांच्यावर अत्याचार तर करतातच. जातीयवादी शिवीगाळ करतात.

मुलाच्या मृत्यूनंतर सून आणि नातवंडांच्या हक्काची मागणी केली असता आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केले. राहायचे असेल तर घरीच राहा, अन्यथा आत्महत्या कर, असे म्हटले. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.

मांस फेकल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल -

 

रांचीच्या थडपखाना येथे प्रतिबंधित मांस फेकल्याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. याप्रकरणी लोअर बाजार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सुधीर बडा यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, रविवारी थडपखाना येथे बंदी घातलेल्या मांसाचा तुकडा रस्त्यावर पोत्यात टाकला जात असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांचे एक पथक तेथे पोहोचले. त्यावेळी स्थानिक लोक गोंधळ घालत होते. त्यांना शांत करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंदी घातलेले मांस जप्त करून पुरले. दाखल एफआयआरच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बंदी घातलेले मांस कोणी फेकले याचा शोध घेतला जात आहे. एचबी रोड थडपखाना येथील एका धार्मिक स्थळाजवळ प्रतिबंधित मांस सापडल्याची घटना रविवारी घडली. स्थानिकांनी रास्ता रोको करून तीव्र निषेध केला. पोलिसांच्या पथकाने येऊन लोकांना शांत केले.

Whats_app_banner
विभाग