मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  धक्कादायक.. पत्नीला फोनवर बोलताना पाहून संतापला पती, कुऱ्हाडीने हात तोडून पळाला

धक्कादायक.. पत्नीला फोनवर बोलताना पाहून संतापला पती, कुऱ्हाडीने हात तोडून पळाला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 11, 2024 09:25 PM IST

Husband Chopped Off Wife Hand : पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यातच पत्नी फोनवर बोलत असल्याचे पाहून त्यांचा संताप अनावर झाला व त्याने पत्नीचा कुऱ्हाडीने हात तोडला व तुटलेला हात घेऊन पसार झाला.

पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने हात तोडला
पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने हात तोडला

पती व पत्नीमध्ये घरगुती वादाची अनेक प्रकरणे समोर येत असतात. मात्र मध्य प्रदेशमध्ये एक पती आपल्या पत्नीला फोनवर बोलताना पाहून इतका नाराज झाला की, त्याने घरात झोपलेल्या पत्नीचा हात कुऱ्हाडीने तोडला. इतकेच नाही तर पत्नीचा तोडलेला हात घेऊन तो घटनास्थलावरून पसार झाला. त्यानंतर पोलीसांनी महिलेचा तुटलेला हात व फरार पतीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली. ही घटना मध्य प्रदेश राज्यातील अशोकनगर जिल्ह्यातील आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

अशोकनगर शहरापासून जवळपास २ किलोमीटर दूर बरखेडी गावात राहणारे मिथिलेश अहिरवार  (वय ३५) बुधवार रात्री आपल्या घरात झोपली होती. त्यावेळी तिचा पती कमळ अहिरवार याने कुऱ्हाडीने तिचा हात कापला व महिलेचा तुटलेला हात घेऊन फरार झाला. 

त्यानंतर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी जखमी महिलेने सांगितले की, तिचा विवाह १६ वर्षापूर्वी झाला होता. तसेच तिला चार लहान-लहान मुले आहेत. तिचा पती प्रत्येक दिवशी तिच्याशी भांडण करत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. घटनेच्या दोन दिवस आधी जेव्हा पत्नीने शेतात पेरणी करण्यास सांगितले तेव्हा पैसे नसल्याचे कारण सांगत पती तिच्याशी भांडण करू लागला.

त्यानंतर बुधवार-गुरुवारच्या रात्री २ वाजण्याच्या सुमारास महिला आपल्या घरात झोपली होती. तेव्हा तिच्या पतीने तिचा कुऱ्हाडीने हात तोडला व तुटलेला हात घेऊन फरार झाला. घरातून महिला व तिच्या लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली व पोलिसांना बोलावले. पोलिसांनी महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

जखमी महिलेने सांगितले की, फोनवर बोलण्यास पतीने मनाई केली होती. तसेच पती तिच्यावर संशय घेत होता. यावरून घरात अनेक वेळा वाद झाला होता. मात्र त्या रात्री वाद इतका विकोपाला गेला की, पतीने तिचा हातच तोडला. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस आरोपी पतीच्या शोधात रवाना झाले. महिलेचा तुटलेला हात शोधणे पोलिसांसमोर एक आव्हान होते. पोलीस आरोपी पतीच्या मुलांना घेऊन अनेक ठिकाणी गेली. मात्र पोलिसांनी घटना घडलेल्या घराजवळ रिकाम्या प्लॉटमध्ये महिलेचा तुटलेला हात मिळाला. 

IPL_Entry_Point