मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Shocking: बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, संतापलेल्या नवऱ्याचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावले
Crime
Crime

Shocking: बायकोला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले, संतापलेल्या नवऱ्याचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावले

18 March 2023, 8:39 ISTAshwjeet Rajendra Jagtap

Uttar Pradesh Shocking:

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या फरुखाबाद येथे विवाहबाह्य संबंध एका तरुणाच्या जीवावर बेतले. विवाहित प्रियसीला भेटयला गेलेल्या तरुणाला तिच्या नवऱ्याने बेदम मारहाण करून घराबाहेरील खांबाला बांधून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संबंधित तरुणाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. विषारी द्रव्य प्राशन केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे आदमपूर येथील एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. हिमाचलच्या एका खाजगी कारखान्यात दोघांची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. विवाहबाह्य संबंधाची कुणकुण लागताच या महिलेचा पती तिला घेऊन आदमपूर येथे आला. मात्र, तरीही या महिलेचे तरुणाशी बोलणे सुरुच होते. दरम्यान, या महिलेने तरुणाला भेटायला तिच्या घरी बोलावले. मात्र, त्याचवेळी या महिलेचा पती घरी आला. पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने या तरुणाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला घराबाहेरील खांबाला बांधून पोलिसांना कळवले.

या संदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठलं. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला जखमी अवस्थेत सीएचसीमध्ये दाखल केले. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा मृत्यू विषारी द्रव्य प्राशन केल्याने झाला आहे.घरात पोलिसांना विषारी पदार्थ सापडला आहे. तरुणाच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर याप्रकरणाचा तपास पुढे जाईल असंही त्यांनी सांगितलं.

विभाग