मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video: पती-पत्नी म्हणावं की एकमेकांचे वैरी; गटारात पडेपर्यंत दोघांत तुफान हाणामारी

Viral Video: पती-पत्नी म्हणावं की एकमेकांचे वैरी; गटारात पडेपर्यंत दोघांत तुफान हाणामारी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 21, 2024 05:02 PM IST

husband and wife fighting video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Viral Video
Viral Video

Funny Video: पती-पत्नीमध्ये वाद होणे ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण, जिथे प्रेम असते तिथे वादही असतोच, असे म्हटले जाते. परंतु, कधीकधी हे वाद गरजेपेक्षा जास्त वाढून नात्यामध्ये दुरावा निर्माण करतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेला पती- पत्नीच्या भांडणाचा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कशामुळे दोघांत भांडणाची ठिणगी पडली? याबाबत काहीच समजले नाही. परंतु, हे दोघेही भांडत असताना गटरात पडल्यानंतरही एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पती बाईक खेचत आहे, जेव्हा त्याची पत्नी त्याला मागून लाथ मारते. यानंतर दोघेही बाईकसह रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटरात पडतात. गटारात पडल्यानंतरही दोघे एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

@gharkekalesh या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने म्हटले आहे की, हे दोघेही अशाच रिल्स बनवतात. लोक रील बनवण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या व्यक्तीने दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग