आतड्यांच्या आजारावर मानवी विष्ठा ठरणार प्रभावी औषध! चुलत भावाच्या विष्ठेमुळे महिलेला मिळाले जीवनदान-human feces will be an effective medicine for bowel disease woman gets life from cousins feces ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आतड्यांच्या आजारावर मानवी विष्ठा ठरणार प्रभावी औषध! चुलत भावाच्या विष्ठेमुळे महिलेला मिळाले जीवनदान

आतड्यांच्या आजारावर मानवी विष्ठा ठरणार प्रभावी औषध! चुलत भावाच्या विष्ठेमुळे महिलेला मिळाले जीवनदान

Sep 15, 2024 08:47 AM IST

human excrement : विष्ठा कुणाचीही असो ती किसळवाणी वाटते. उघड्यावरील विष्ठेमुळे आजार देखील संभावू शकतात. मात्र, हीच विष्ठा एका महिलेच्या पोटाच्या विकारांवर प्रभावी औषध ठरले आहे.

आतड्यांच्या आजारावर मानवी विष्ठा ठरणार प्रभावी औषध! चुलत भावाच्या विष्ठेमुळे महिलेला मिळाले जीवनदान
आतड्यांच्या आजारावर मानवी विष्ठा ठरणार प्रभावी औषध! चुलत भावाच्या विष्ठेमुळे महिलेला मिळाले जीवनदान

human excrement : विष्ठा कुणाचीही असो ती किसळवाणी वाटते. उघड्यावरील विष्ठेमुळे आजार देखील संभावू शकतात. मात्र, हीच विष्ठा एका महिलेच्या पोटाच्या विकारांवर प्रभावी औषध ठरले आहे. होय हे खरे आहे. आता मानवी विष्ठेचा प्रभावी वैद्यकीय उपचार म्हणून वापर केला जात आहे. एका महिलेला आतड्यांच्या आजाराने त्रस्त होती. यावर डॉक्टरांनी प्रभावी उपाय म्हणून तिच्या चुलत भावाच्या विष्ठेचा वापर केला. यामुळे ही महिला आतड्याच्या आजारापासून मुक्त झाली आहे.

आतड्याच्या आजारामुळे अनेक त्रस्त असतात. असाच काहीसा त्रास काही वर्षांपूर्वी मेघा नागपाल या महिलेला होता. ती जेव्हाही बाहेर फिरायला जात असे तेव्हा तिच्या या आजारमुळे तिच्या खण्यापिण्यावर अनेक निर्बंध येत होते. तब्बल १८ वर्षांपासून क्रॉनिक अल्सरेटिव्ह कोलायटिस या आतड्यांच्या आजारमुळे ती ट्रस्ट होती. यामुळे तिचा विष्ठेतून रक्त येत होते. मात्र, 'पूप ट्रान्सप्लांट'मुळे या ३७ वर्षीय शिक्षिकेचं आयुष्यच बदलून गेलं. ही महिला आता मुक्तपणे फिरू शकते व तिच्या खाण्यापिण्यावर देखील निर्बंध राहिलेले नाहीत.

या बाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने नुकतीच व्हिएतनाम टूर केली असून तिने या आजारातून बरे झाल्यावर तिचा अनुभव कथन केला आहे. ही महिला २०२२ पूर्वी फक्त मीठ आणि हळद घालून उकडलेला तांदूळ खाऊ शकत होती. आता ते दिवस संपले असून ती सुखाने आयुष्य जगत आहे.

नागपाल या दिल्लीच्या मणिपाल रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. (कर्नल) अवनीश सेठ यांनी केलेल्या फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लांट (एफएमटी) च्या १०० रुग्णापैकी एक आहेत. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) व्यापक क्लिनिकल चाचण्यांनंतर विष्ठेचा औषध म्हणून वापर करण्यास मान्यता दिल्यानंतर डॉ. सेठ यांनी नोव्हेंबर २०१४ मध्ये भारतातील पहिला एफएमटी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया केली होती.

एफएमटीला निरोगी आतडे असलेल्या एखाद्या व्यक्तिची विष्ठा घेऊन ती आजारी व्यक्ति असलेल्या व्यक्तीच्या आताड्यात टाकली जाते. यामुळे आजारी व्यक्तीच्या पोटातील खराब जिवाणू दात्याच्या निरोगी जीवाणूद्वारे ठीक होतात.

मानवी आतडे हे विविध मायक्रोबायोमने भरलेले आहेत. हे शास्त्रज्ञांना बर्याच काळापासून माहित आहे, परंतु आता त्यांना या विषाणूंचे महत्व लक्षात येत आहे. हे विषाणू पचनास मदत करतात. तसेच शरीरात काही रसायने तयार करतात त्यामुळे शरीराचे नियमन होते व हानिकारक रोगजनकांपासून आपले संरक्षण करते. अँटिबायोटिक्स, स्टिरॉइड्सचा अतिवापर किंवा क्लोस्ट्रिडियम डिफिसाइल (सी डिफ) संसर्ग यासारख्या आतड्याच्या आजारासाठी कारणीभूत आहेत.

नागपाल ययांनी शेवटचा पर्याय म्हणून एफएमटी शस्तरकिर्या करण्याचा निर्णय घेतला. या साठी त्यांच्या चुलत भावाच्या विष्ठेचा वापर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी करण्यात आला. शस्त्रक्रिया झाल्यावर तिसऱ्या सत्रानंतर त्यांच्यात मोठा बदल झाला. त्यांच्या आजार दूर झाला आहे. तसेच स्टिरॉइड् सारख्या औषधापासून त्यांची मुक्तता झाली आहे.

केरळच्या राजागिरी रुग्णालयातील हेपेटोलॉजिस्ट डॉ. सायरिक अॅबी फिलिप्स म्हणतात की रुग्णालयात एफएमटीचा वापर गंभीर अल्कोहोलशी संबंधित हिपॅटायटीस (एसएएच) वर उपचार करण्यासाठी केला जात आहे. एसएएचने प्रभावित झालेल्यांमध्ये यकृत प्रत्यारोपणाशिवाय जगण्याची शक्यता फारच कमी असते. परंतु एफएमटीनंतर रुग्ण अधिक काळ आणि निरोगी राहतात, असे रुग्णालयाला आढळले.

 

Whats_app_banner
विभाग