अमेरिकेतील एका महिलेने तरुण दिसण्यासाठी धोकादायक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. ४७ वर्षीय महिलेने सांगितले आहे की, ती आपले तारुण्या टिकवण्यासाठी आपल्या २३ वर्षीय मुलाचे ब्लड ट्रांसफ्यूजन करणार आहे. या कामासाठी आपला मुलगा त्याचे रक्त देण्यास आनंदाने तयार आहे, असा दावाही या महिलेने केला आहे.
लॉस एंजेलिसमध्ये राहणारी मार्सेला इग्लेसिया 'ह्युमन बार्बी' म्हणूनही ओळखली जाते. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने आतापर्यंत विविध कॉस्मेटिक सर्जरीवर ९९,००० डॉलरपेक्षा अधिक खर्च केले आहेत. ती कडक हेल्थ रूटीन फॉलो करते. याशिवाय ती दररोज एक तास व्यायामही करते. तिच्या यादीतील नवीन पद्धत म्हणजे रक्त संक्रमण (ब्लड ट्रांसफ्यूजन).
आपल्या निर्णयाबद्दल बोलताना महिलेने न्यूयॉर्क पोस्टला सांगितले की, "रक्त संक्रमण आपल्या शरीरातील तरुण पेशी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, विशेषत: जेव्हा हे रक्त आपल्या स्वत: च्या मुलास किंवा मुलीकडून भेटते. यंग डोनरच्या सेल्सने अनेक फायदे होऊ शकतात. महिलेने पुढे सांगितले की, जेव्हा तिने स्टेम सेल थेरपी चा प्रयत्न केला तेव्हा तिला या पद्धतीबद्दल समजले. इग्लेसियस यांनीही प्रक्रिया समजावून सांगितली. "रक्त संक्रमण ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी आपल्या शरीरात नवीन लाल रक्तपेशी आणते.
प्लाझ्मामध्ये प्रथिने आणि गोठण्याचे घटक असतात जे रक्तस्त्राव किंवा बरे होण्यास मदत करण्यासाठी उत्कृष्ट असतात. तथापि, कधीकधी हे धोकादायक देखील सिद्ध होऊ शकते.
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने २०१९ मध्ये रक्त संक्रमणादरम्यान प्लाझ्मा संसर्गाविरोधात इशारा दिला होता. एफडीएने एका अलर्टमध्ये लिहिले आहे की या प्रक्रियेशी संबंधित सार्वजनिक आरोग्याच्या अनेक चिंता आहेत. यामुळे वृद्धत्व आणि स्मरणशक्ती कमी होणे, पार्किन्सन रोग, मल्टिपल स्क्लेरोसिस, अल्झायमर रोग, हृदयरोग किंवा तणाव यासारखे गंभीर आजार होऊ शकतात. "