Viral News : एका योग शिक्षिकेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. मात्र, योग विद्येच्या साह्याने या महिलेने आपला जीव वाचवला आहे. पोलिसांनी शुक्रवारी या बाबत माहिती दिली. एका ३४ वर्षीय योग शिक्षिकेवर काही अज्ञात आरोपींनी हल्ला केला. तिचा आधी मारहाण करण्यात आली. यानंतर वायरच्या साह्याने तिचा गळा आवळून खून केला. तिचा मृत्यू झाल्याचे समजून त्यांनी तिला खड्ड्यात गाडले. मात्र, योग विद्येच्या द्वारे श्वासोच्छवासाचा वेग कमी करत या महिलेने स्वत:चा जीव वाचवला आहे. पोलिसांनी या प्रकरणी बिंदू नावाची महिला व बेंगळुरूमध्ये गुप्तहेर यंत्रणा चालवणारा तिचा मित्र सतीश रेड्डी यांच्यासह पाच जणांना अटक केली आहे. ही घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. तसेच महिलेच्या कौशल्याचे कौतुक केलं जात आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी बिंदूला तिच्या पतीचे एका योग शिक्षिकेसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. यामुळे तिने पतीवर नजर ठेवण्यासाठी हेर नेमला. रेड्डी याला बिंदुने महिलेवर व तिच्यापतीवर नजर ठेवण्यास सांगितले. दरम्यान, सर्व माहिती मिळाल्यावर तिने तिच्या हत्येचे षडयंत्र रचले. आरोपी बिंदुने तीन महिन्यांपूर्वी पीडित योग शिक्षिकेशी योगा क्लास घेण्याच्या बहाण्याने मैत्री केली आणि या दरम्यान त्याने तिचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले.
पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, २३ ऑक्टोबर रोजी शहरातील काही ठिकाणे दाखविण्याच्या बहाण्याने तिने तिला दिब्बुराहळ्ळीजवळील तिच्या घरी आणले. यानंतर तिघे जण बाहेर पडले. त्यांच्या कारमध्ये इतर काही आरोपी देखील होते. त्यांनी योग शिक्षिकेला शहराबाहेरील एका निर्जन स्थळी नेले. या ठिकाणी त्यांनी तिला गंभीर मारहाण केली. तिचे कपडे देखील फाडले.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी तिला मारहाण केली. धमकावले आणि यानंतर वायरने गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. यावेळी पीडितेने हुशारी दाखवत बेशुद्ध अवस्थेत श्वासोच्छवासाच्या तंत्राचा वापर केला. श्वासाच्या वेगावर नियंत्रण मिळवून तिचा मृत्यू झाल्याचे तिने भासवले. दरम्यान, आरोपींना महिलेचा मृत्यू झाल्याचे वाटले. यानंतर त्यांनी खड्डा खोदून तिला तिथेच पुरले. घाईगडबडीत असल्याने आणि पकडले जाण्याची भीती असल्याने खड्डा फार खोल खोदण्यात आला नव्हता. दरम्यान, तेथून जाण्यापूर्वी त्यांनी पीडिटेच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटले.
आरोपी फरार झल्यावर पीडित महिला ही खड्ड्यातून बाहेर पडली आणि काही गावकऱ्यांच्या मदतीने कपडे घेऊन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अपहरण, खुनाचा प्रयत्न आणि भारतीय दंड संहितेच्या इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रेड्डी आणि बिंदूसह पाच जणांना ६ नोव्हेंबर रोजी अटक केली.