How To Wear Saree In Rain: सोशल मीडियावर नेहमीच काहीतरी नवीन पाहायला मिळते. अशाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये महिलांनी पावसळ्यात कशी साडी नेसायची, हे दाखवण्यात आले आहे, जे अनेक महिलांसाठी खूप अवघड काम आहे. मात्र, महिलांचे हे टेन्शन कायमचे मिटले असून त्या बिनधास्तपणे पावसाळ्यात साडी नेसू शकतात.
करिश्मा धीरज अशा इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये महिलांनी पावसाळ्यात कशा पद्धतीने साडी नेसायची? ज्यामुळे त्यांना चालताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, असे दाखवण्यात आले. पावसात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? हे देखील सांगण्यात आले. व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला एका हाताने पदर कमरेवर खोचण्यास आणि नंतर दुसऱ्या हातात छत्री पकडण्यास सांगते. त्यानंतर चालून दाखवते. हा व्हिडिओ महिलांना प्रचंड आवडला आहे. या व्हिडिओ अनेक मजेशीर कमेंट देखील आल्या आहे. सध्या सोशल मीडियावर साडी आणि पावसाळाा हा विषय ट्रेण्ड होताना दिसतोय.
याआधीही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात महिलांनी साडी नेसल्यावर कसे बसायचे? साडी नेसून ट्रेनमधून प्रवास करताना साडी कशी होल्ड करायची, अशा व्हिडिओंचा समावेश आहे. पाहायला गेले तर, या व्हिडिओद्वारे महिलांना खूप पद्धतीने समजावून सांगण्यात आले.