Aadhar Card Photo Update Process: आधार कार्ड हे भारतातील नागरिकांसाठी सर्वात महत्वाचे ओळख पुरावा कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी काम असो किंवा खाजगी काम,आधार कार्डची सर्वत्र गरज असते. पण, आधार कार्डवरील फोटो खराब आहे अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हाला आधार कार्डमधील तुमचा फोटो आवडत नसेल किंवा तुमचा चेहरा स्पष्ट दिसत नसेल, तर तुम्ही तो सहज बदलू शकता. यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील.
आधार कार्डवरील फोटो बदलण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. ऑनलाईन पद्धतीने किंवा आधार केंद्रावर जाऊन आधारवरील फोटो अपडेट करता येऊ शकतो.
- जवळच्या आधार केंद्राला भेट द्या.
- यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून ‘आधारअपडेट फॉर्म’ डाउनलोड करा.
- हा फॉर्म आधार केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याला द्यावा, तसेच तुमची बायोमेट्रिक माहिती त्यांना द्यावी.
- यानंतर अधिकारी तुमचा फोटो काढतील.
- माहिती अपडेट करण्यासाठी १०० फी भरावी लागेल.
- तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) सह आधार पावती मिळेल, ज्याचा उपयोग आधार अपडेट स्थिती जाणून घेण्यासाठी केला जातो.
- आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
- आता ‘माय आधार’ हा पर्याय निवडा.
- डाउनलोड आधार हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावी.
- त्यानंतर तुमच्यासमोर नवा विंडो उघडेल, ज्यात आधार क्रमांक, नावनोंदणी आयडी किंवा व्हर्च्युअल आयडी टाकावी लागणार.
- मग कॅप्चा भरा आणि 'ओटीपी पाठवा' पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, जो एंटर करा.
- आता व्हेरिफाय आणि डाऊनलोड या बटणावर क्लिक करा आणि तुमचे आधारकार्ड डाउनलोड करा.