Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? 'या' सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? 'या' सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!

Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? 'या' सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!

Jan 18, 2025 11:16 PM IST

What is Digital Arrest Scam: डिजिटल व्यवहारासह डिजिटल गुन्हेगारीच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, योग्य ती खबरदारी घेतल्यानंतर अशा संभावित धोक्यांना टाळता येऊ शकते.

Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? 'या' सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!
Digital Arrest: डिजिटल अरेस्ट होण्यापासून स्वतःला कसे वाचवायचे? 'या' सोप्या टिप्समुळे राहाल सुरक्षित!

How to Protect Yourself from Digital Arrest: इंटरनेटमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्या आहेत, पण त्याचबरोबर सायबर गुन्हेगारीचे जाळे वेगाने पसरत चालले असून ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून लोकांच्या मेहनतीचा पैसा एका झटक्यात लुबाडत आहेत.डिजिटल अरेस्ट हा आता त्यात एक नवीन प्रकार उदयाला आला आहे, यात लोकांना डिजिटल स्वरुपात अटक केली जाते. दरम्यान, डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय, त्यापासून वाचण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

एखादी व्यक्ती पोलीस, ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगून लोकांना मेसेज पाठवला जातो किंवा थेट व्हीडिओ कॉल केला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावण करतो. तसेच बराच वेळ त्या व्यक्तीला व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉलवर राहायला सांगितले जाते, ज्याला डिजिटल अरेस्ट असे म्हटले जाते.

वयैक्तिक माहिती चोरून घेतात कर्ज

ज्या लोकांच्या खात्यात लाखो रुपये आहेत, त्यांनाच सायबर गुन्हेगार लक्ष्य करतात, असे अनेकांचा गैरसमज आहे. कारण सायबर गुन्हेगार तुमची वयैक्तिक माहिती चोरून तुमच्या नावावर कर्ज घेऊन फसवणूक करू शकतात. सायबर गुन्हेगार डिजिटल अटकेद्वारे तुमच्या बँक खात्याची माहिती आणि इतर माहिती मिळवतात. यानंतर, ते तुमच्या नावावर अगदी सहजपणे वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात, ज्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येते आणि नंतर ते पैसे तुमच्या बँक खात्यातून गायब केले जातात. भारतात अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला लाख रुपयांपर्यंत प्री अप्रूव्ड कर्ज देतात. सायबर गुन्हेगार या सेवेचा फायदा घेतात. सायबर गुन्हेगार तुमच्या नावावर बनावट वैयक्तिक कर्ज इत्यादी मिळवण्यासाठी क्रेडिट कार्डचा देखील वापर करतात.

ओटीपी मिळवून लुटतात पैसे

डिजिटल अटकेदरम्यान तोतया पोलिस, सीबीआय किंवा इतर कायदेशीर संस्था तुम्हाला स्काईप किंवा व्हॉट्सअॅप इत्यादींवर व्हिडिओ कॉल करण्यास सांगतात. याशिवाय, तुमच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करायला लावतात, ज्यामुळे तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्यांना सहज मिळतो.

सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

सायबर गु्न्हेगारीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. सायबर गुन्हेगार सुरुवातीला आपल्या टार्गेटला अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन करतात किंवा त्यांना मेसेज किंवा लिंक पाठवतात. अशावेळी नेहमी लक्षात ठेवा की, तुमचा ओटीपी, बँक तपशील आणि वैयक्तिक तपशील कधीही कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. सायबर गुन्हेगार इंटरनेट बँकिंगद्वारे तुमच्या बँक खात्यात लॉग इन करू शकतात. यानंतर, तेथून लाखो रुपयांचे व्यवहार करता येतात. यासाठी तुमच्या बँक खात्यासाठी एक मजबूत पासवर्ड वापरा.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर