How to port your mobile number to Airtel: भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील, इतक्याच टेलिकॉम कंपन्या आहेत . बीएसएनएल ही एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. तर, खासगी कंपन्यांमध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन- आयडिया यांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांना सिम कार्ड खरेदी करताना यापैकी एकाची निवड करावी लागते. मात्र, अनेकदा ग्राहकांना काही कारणास्तव सिम कार्ड पोर्ट करण्याची गरज भासते. परंतु, अनेकजण गॅलेरीत जाऊन वेळ घालवण्यापेक्षा आहे त्याच कंपनीचे सिमकार्ड वापरतात. अशा ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सिमकार्ड पोर्ट करता येणार आहे.
भारतातील धावपळीच्या टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये ग्राहकांना अनेकदा विविध कारणांमुळे सर्व्हिस प्रोव्हायडर बदलण्याचा विचार करतात. जर आपण जिओ, व्हीआय किंवा बीएसएनएलमधून एअरटेलमध्ये आपला मोबाईल नंबर पोर्ट करण्याचा विचार करत असाल प्रक्रिया सोपी आहे. आपला मोबाइल क्रमांक ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे कसा पोर्ट करता येईल? हे जाणून घेऊयात.
- सर्वात प्रथम आपल्या नंबरने 'PORT your mobile number' असा मॅसेज टाइप करून १९०० वर पाठवावे.
- यानंतर एसएमएसद्वारे एक युनिक पोर्टिंग कोड प्राप्त होईल, जो पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वाचा आहे.
- आवडता रिचार्ज प्लॅन निवडण्यासाठी एअरटेलच्या वेबसाईट किंवा अॅपवर जा, जिथे वैयक्तिक तपशीलांसह फॉर्म भरायचा आहे.
- फॉर्म भरल्यानंतर 'सबमिट' बटण दाबा.
- यानंतर ग्राहकाला एअरटेल एक्झिक्युटिव्हकडून कॉल येईल.
- एअरटेल एक्झिक्युटिव्ह सिम कार्ड डिलिव्हरी करताना यूपीसी कोड इतर कागदपत्रांची पडताळणी करेल.
- यानंतर तुमचा नंबर एअरटेल नेटवर्कवर ४८ तासांच्या आत अॅक्टिव्हेट होईल.
- सर्वप्रथम जवळच्या एअरटेल स्टोअरला भेट द्या.
- आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वीज बिल यासारखी वैध ओळख आणि पत्त्याचा पुरावा कागदपत्रे सोबत घेऊन जा.
- तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 'PORT your mobile number' असा मॅसेज टाइप करून १९०० वर पाठवावे.
- यानंतर एअरटेल स्टोअर एक्झिक्युटिव्हच्या सूचनांचे पालन करा.
- सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पोर्टिंगसाठी आवश्यक असलेल्या रिचार्ज प्लॅनसाठी पैसे द्या.
- यानंतर ४८ तासांच्या आत तुमचा नंबर एअरटेलमध्ये पोर्ट होईल.