ayushman card : आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढली! कसा घ्याल लाभ? घरबसल्या कसं काढाल आयुष्मान कार्ड? वाचा!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ayushman card : आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढली! कसा घ्याल लाभ? घरबसल्या कसं काढाल आयुष्मान कार्ड? वाचा!

ayushman card : आयुष्मान योजनेची व्याप्ती वाढली! कसा घ्याल लाभ? घरबसल्या कसं काढाल आयुष्मान कार्ड? वाचा!

Jun 27, 2024 05:47 PM IST

how to make ayushman card : केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. हे कार्ड घरबसल्या काढता येतं. कसं? वाचा!

घरबसल्या कसं काढाल तुमचं आयुष्मान कार्ड? जाणून घ्या सोपी पद्धत
घरबसल्या कसं काढाल तुमचं आयुष्मान कार्ड? जाणून घ्या सोपी पद्धत

how to make ayushman card : केंद्र सरकारनं २०१८ साली आणलेल्या आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आता वाढली आहे. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांना तसंच, ७० वर्षांवरील नागरिकांनाही याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळं या योजनेचं महत्त्व वाढलंय. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या आयुष्मान भारत कार्डसाठीही चौकशी होऊ लागली आहे.

आतापर्यंत तब्बल ३० कोटी आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात आली आहेत. अजूनही रोजच्या रोज या कार्डसाठी नोंदणी होत आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आयुष्मान कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करता येईल. तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे हा अर्ज करू शकता.

आयुष्मान कार्डसाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्याआधी ही योजना काय आहे? तिचे लाभ मिळवण्यासाठी पात्रता काय लागते? याची माहिती घेऊया…

आयुष्मान भारत योजना म्हणजे काय?

केंद्र सरकारने २०१८ मध्ये गरीब लोकांसाठी आयुष्मान भारत योजना सुरू केली होती. ज्या अंतर्गत नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंतचा मोफत आरोग्य विमा दिला जातो. हे कार्ड दरवर्षी अपडेट केलं जातं, याचा अर्थ प्रत्येक वर्षी लाभार्थी ५ लाख रुपयांच्या मोफत उपचाराचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत समाविष्ट विविध खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेता येतात. गरीब लोकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणं हा या योजनेचा उद्देश आहे.

कोण काढू शकतो आयुष्मान कार्ड?

आयुष्मान कार्डसाठी केवळ भारतातील कायमस्वरूपी रहिवासी अर्ज करू शकतात.

या योजनेचा लाभ बीपीएल प्रवर्गात येणाऱ्या दुर्बल घटकातील नागरिकांना दिला जाणार जातो. मात्र, आता पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसंच, ७० वर्षांवरील वृद्धांनाही या योजनेत सामावून घेतलं जाणार आहे.

असं काढा आयुष्मान कार्ड

> सर्वात आधी आयुष्मान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

> वेबसाइटवर दिलेल्या ‘Beneficiary Login’ टॅबवर क्लिक करा.

> तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. इथं आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा नंबर टाका आणि OTP व्हेरिफाय करा.

> तुम्हाला E-KYC चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा आणि प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण करा.

> हे केल्यानंतर पुढील पान उघडेल. ज्या सदस्याचं आयुष्मान कार्ड बनवायचं, त्याला निवडा.

> तुम्हाला पुन्हा ई-केवायसी आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि लाइव्ह फोटोसाठी, कॉम्प्युटर फोटो आयकॉनवर क्लिक करा आणि सेल्फी अपलोड करा.

> तुम्हाला Additional Option हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या प्रविष्ट करा.

> सबमिट बटणावर क्लिक करा आणि अर्ज सबमिट करा.

सर्वकाही बरोबर आढळल्यास आयुष्मान कार्ड २४ तासांच्या आत मंजूर केलं जाईल. हे कार्ड तुमच्या मोबाईल फोनमध्येही डाउनलोड करू शकता.

आयुष्मान कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

शिधापत्रिका

मोबाइल नंबर

बँक पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर