भारतीय निवडणूक आयोग (ECI) गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संसदेने स्वीकारलेल्या निवडणूक कायदे (सुधारणा) कायदा, २०२१ अंतर्गत प्रत्येकाला त्यांचे मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्यास सांगतलं आहे. दोन ओळखपत्रे जोडण्याचा उद्देश मतदार यादीतील नोंदींची पडताळणी करणे, मतदारांची ओळख प्रमाणित करणे आणि एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा किंवा अनेक मतदारसंघात नोंदणी केली आहे की नाही हे तपासणे हा आहे.
मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप मतदान ओळखपत्र किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र (EPIC) शी आधार लिंक करणे बंधनकारक केलेले नाही. आधार क्रमांक न दिल्यास विद्यमान मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, असे निवडणूक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
आता तुम्हाला तुमचे आधार कार्ड ऑनलाइन मतदार ओळखपत्राशी लिंक करायचे असेल, तर निवडणूक आयोगाने काही सोप्या स्टेप्स शेअर केल्या आहेत. तुमचे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी खाली दिलेली सोपी माहितीला भरा.
स्टेप १ : Google Play Store आणि Apple App Store वरून फोनवर 'व्होटर हेल्पलाइन अॅप' डाउनलोड करा.
स्टेप २ : अॅप उघडा आणि 'I Agree' पर्यायावर क्लिक करा आणि 'Next' वर टॅप करा.
स्टेप ३: पहिला पर्याय 'मतदार नोंदणी' वर टॅप करा
स्टेप ४ : इलेक्टोरल ऑथेंटिकेशन फॉर्म (फॉर्म 6B) वर क्लिक करा आणि उघडा
स्टेप ५ : आता 'Let's Start' वर क्लिक करा.
स्टेप ६ : आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा अधिकृत मोबाईल नंबर एंटर करा आणि Send OTP वर टॅप करा आणि 'Verify' वर क्लिक करा.
स्टेप ७ : आता 'Yes I Have Voter ID' वर क्लिक करा आणि नंतर 'Next' वर क्लिक करा.
स्टेप ८ : आता तुमचा मतदार आयडी क्रमांक (EPIC) एंटर करा, तुमचे राज्य निवडा आणि 'तपशील आणा' वर क्लिक करा.
स्टेप ९ : आता 'प्रोसीड' वर क्लिक करा.
स्टेप १० : आधार क्रमांक, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि प्रमाणीकरण प्रविष्ट करा आणि 'पूर्ण झाले' (Done)वर क्लिक करा.
स्टेप ११ : प्रक्रिया पूर्ण झाल्यावर फॉर्म 6B पूर्वावलोकन पृष्ठ उघडेल. तुमचे तपशील पुन्हा तपासा आणि तुमचा फॉर्म 6B अंतिम सबमिशन करण्यासाठी 'पुष्टी करा' (Confirm) वर क्लिक करा.
संबंधित बातम्या