How to Hide WhatsApp Location: व्हॉट्सअप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करताना आयपी अॅड्रेसद्वारे वापरकर्त्यांचे योग्य ठिकाण कळू शकते. हे लक्षात येताच व्हॉट्सअपने वापरकर्त्यांसाठी प्रोटेक्ट फीचर लॉन्च केले आहे. या फीचरद्वारे वापरकर्त्यांना त्यांचे लोकेशन गुपीत ठेवता येणार आहे. यासाठी वापरकर्त्याला व्हॉट्सअपच्या सेटिंग्समध्ये काही बदल करावी लागतील.
व्हॉट्सअपने एका ब्लॉग पोस्टमध्ये नवीन फीचरबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, प्रोटेक्ट फीचर्सच्या मदतीने वापरकर्त्यांचे कॉल व्हॉट्सअप सर्व्हरवर रिले केले जातात. यामुळे ऑडिओ आणि व्हिडिओदरम्यान समोरच्या व्यक्तीला वापरकर्त्यांचा आयपी अॅड्रेस दिसत नाही. ज्यामुळे वापरकर्ते नेमके कोणत्या ठिकाणी आहे, हे समजणे कठीण आहे.
- सर्वात प्रथम व्हॉट्सअप अपडेट करा आणि त्यानंतर उघडा.
- व्हॉट्सअपच्या सेटिंग्समध्ये जाऊन Privacy वर क्लिक करा.
- या पेजवर गेल्यानंतर खाली स्क्रोल करा, जिथे Advanced हा पर्याय दिसेल. यावर टॅप करा.
- यानंतर Protect IP address in calls पर्यायावर क्लिक केल्यास समोरच्या व्यक्तीला तुमचे लोकेशन दिसणे बंद होईल.
व्हॉट्सअपच्या प्रोटेक्ट फीचर्सद्वारे वापरकर्त्यांचा आयपी अॅड्रेस सुरक्षित राहील, ज्यामुळे तुमचे लोकशन कोणालाही कळणार नाही. याशिवाय, तुम्हाला अनोळखी नंबरवरून कोणतेही व्हॉट्सअप कॉल येऊ नयेत, असे वाटत असेल, तर तुम्हाला प्रायव्हसी सेटिंग्जच्या कॉल ऑप्शनमध्ये सायलेंट अननोन कॉलर्सच्या समोर दिसणारे टॉगल चालू करावे लागेल. सायबर हल्ले आणि घोटाळ्यांपासून संरक्षण देण्यासाठी अॅपद्वारे हे फीचर आणले गेले आहे.
अलीकडेच व्हॉट्सअॅपने चॅनल्स नावाचे एक नवे फीचर लॉंच केले आहे. या फीचरला वापरकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग म्हणाले की, चॅनेलने ५० कोटी वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला आहे.