मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  चांगला मुलगा कसा जन्माला येतो? सासरच्या लोकांनी सुनेला दिल्या टिप्स, मात्र झाले असे की..

चांगला मुलगा कसा जन्माला येतो? सासरच्या लोकांनी सुनेला दिल्या टिप्स, मात्र झाले असे की..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 23, 2024 09:12 PM IST

Kerala News : मुलगा कसा जन्माला येतो? याबाबतची माहिती एका नववधूला तिच्या सासरच्यांनी लग्नाच्या पहिल्याच रात्री दिली होती. मात्र मुलगी झाल्यावर तिचा छळ सुरू केला.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

 मुलगा कसा जन्माला येतो? केवळ मुलगाच नाही तर चांगला मुलगा कसा जन्माला येतो याच्या टिप्स सासरच्या लोकांनी त्यांच्या सुनेला दिल्या होत्या. सासरच्या लोकांनी सुनेला या टिप्स नववधूच्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच दिल्या. मात्र सुनेला मुलगा नाही तर मुलगीच झाली. महिलेला लग्नानंतर दोन वर्षांनी मुलगी झाल्यानंतर सासरच्या लोकांनी तिचा छळ करणे सुरू केले. सासरच्या लोकांच्या शारिरीक व मानसिक त्रासाला कंटाळून महिलेने केरळ हायकोर्टात धाव घेत पतीसह सासू-सासऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी केली. 

लिव लॉ च्या रिपोर्टनुसार महिलेने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, संभोग करण्याचे पद्धव व वेळही तिला सांगितली होती. जेणेकरून मुलगाच जन्माला येईल. या टिप्सचे पालन केल्यास केवळ मुलगाच नव्हे तर चांगला मुलगा जन्माला येईल. पती व त्याच्या कुटूंबाने यावर जोर दिला होता की, सुनेने या सूचनांचे पालन करावे कारण त्यांचे मानणे होते की, मुली आर्थिक बोझ असतात.

महिलेने आपल्या सासरच्या लोकांविरोधात केरळ उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. याचिकाकर्त्या महिलेचे वय ३९ आहे व ती केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील रहिवासी आहे. महिलेने सांगितले की, तिचा विवाह एप्रिल २०१२ मध्ये झाला होता. लग्नानंतर तिला सांगितले की, केवळ मुलालाच जन्म द्यायचा. मात्र मुलगी झाल्यानंतर पती व सासरच्या लोकांनी तिचा वर्षानुवर्षे छळ केला. याबाबत महिलेने अनेक संघटनांशी संपर्क केला मात्र फायदा झाला नाही. 

अखेर महिलेने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. तिची तक्रार ऐकून  न्यायाधीशांनी  यावर घृणा आणि आश्चर्य व्यक्त केले. जस्टिस देवन रामचंद्रन यांनी म्हटले की, अशा घटना केरळ सारख्या राज्यात होतात, हे पाहून आश्चर्य वाटते. याबाबत कोर्टाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडूनही जबाब मागितला आहे. याबाबत पुढची सुनावणी २९ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

WhatsApp channel

विभाग