तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? विक्रीतून दरवर्षी होते ५०० कोटी रुपयांची कमाई-how tirupati balaji prasadam laddu prepared controversy history of recipe 500 crore income ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? विक्रीतून दरवर्षी होते ५०० कोटी रुपयांची कमाई

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू कसे तयार होतात? विक्रीतून दरवर्षी होते ५०० कोटी रुपयांची कमाई

Sep 20, 2024 03:43 PM IST

Tirupati balaji prasad : तिरुपती बालाजी मंदिराच्या स्वयंपाकघरात तीनशे वर्षांहून अधिक काळ महाप्रसाद म्हणून तुपाचे लाडू तयार केले जातात. लाडूचा हा प्रसाद तयार करण्यासाठी सुरुवातीला देशी तुपात बुंदी बनवली जाते आणि नंतर त्यात सुका मेवा व गुळाचे सरबत घालून लाडू तयार केले जातात.

तिरुपती बालाजी येथील प्रसाद लाडू कसे तयार होतात? विक्रीतून दरवर्षी होते ५०० कोटी रुपयांची कमाई
तिरुपती बालाजी येथील प्रसाद लाडू कसे तयार होतात? विक्रीतून दरवर्षी होते ५०० कोटी रुपयांची कमाई

Tirupati balaji prasad : आंध्र प्रदेशातील जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या लाडूच्या प्रसादावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका अहवालाचा हवाला देत आरोप केला आहे की, पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारच्या काळात महाप्रसादात गाईची चरबी व डुकराच्या चरबीची भेसळ केली जात होती. टीडीपीने वायएसआर काँग्रेसवर हिंदूंचा विश्वास व भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. लाडू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप शुद्ध नसून त्यात गायीची चरबी मिसळल्याचे देखील एका अहवालात स्पष्ट झालं आहे. दरम्यान, वादात सापडलेला हा प्रसाद जगभरात प्रसिद्ध आहे. लाडूचा हा खास प्रसाद मंदिराच्या स्वयंपाकघरातच तयार केला जात असून त्याला पोट्टू म्हणतात.

कासा तयार होतो तिरुपती बलाजीचा प्रसाद

तिरूपती बालाजी येथील महाप्रसाद लाडू बनवण्याच्या प्रक्रियेला 'दित्तम' म्हणतात. त्यात सर्व गोष्टी विशिष्ट प्रमाणात घेतल्या जातात. ३०० वर्षांच्या इतिहासात लाडू तयार करण्याची पाककृती फक्त सहा वेळा बदलण्यात आली आहे. २०१६ मध्ये तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डाच्या अहवालानुसार, या लाडूमध्ये दैवी सुगंध असल्याचं म्हटलं जात. हा लाडू तयार करण्यासाठी सुरुवातीला बेसन भाजल्या जाते आणि या बेसनापासून बुंदी तयार केली जाते. लाडू खराब होऊ नयेत म्हणून गुळाचे सरबत वापरले जाते. त्यानंतर त्यात आवळा, काजू आणि बेदाणे मिसळून लाडू तयार केला जातो. सुरुवातीला बुंदी बनवण्यासाठी खास देशी तुपाचा वापर केला जातो.

दररोज तीन लाख लाडू होतात तयार

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तिरूपती बालाजी येथे दररोज सुमारे ३ लाख लाडू तयार केले जातात. मंडळाला एका वर्षात लाडूंपासून अंदाजे ५०० कोटी रुपये देवस्थानाला मिळतात. १७७५ पासून प्रसाद म्हणून लाडू तयार केले जातात. २०१४ मध्ये तिरुपती लाडूलाही जीआय टॅग देखील मिळाला होता. आता या नावाखाली लाडू विकता येणार नाहीत. या लाडूंमध्ये मुबलक प्रमाणात साखर, काजू आणि मनुके असतात. एका लाडूचे वजन सुमारे १७५ ग्रॅम असते.

जुलै महिन्यात अहवालात आढळली होती धक्कादायक माहिती

२३ जुलै रोजी लाडूंच्या चवीबाबत तक्रारीनंतर तपासणी करण्यात आली होती. त्यात नारळ, कापूस आणि मोहरीचे तेलही आढळून आले. जूनमध्ये, टीडीपी सरकारने एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याची टीटीडीचे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Whats_app_banner
विभाग