Sunita Williams News : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स सध्या अंतराळात अडकून पडली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये सुनिता परत येणे अपेक्षित होते. पण आता नासाने सुनीताच्या परतीला आणखी उशीर होऊ शकतो, असे म्हटले आहे. अंतराळात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स अंतराळात विविध प्रयोग करत आहेत. त्या सुर्योदय आणि सूर्यास्त किती वेळा पाहतात हे तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनीता विल्यम्स एकाच दिवसात चक्क १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहतात. अंतराळात दर ४५ मिनिटांनी सूर्योदय आणि सूर्यास्त होतो. अंतराळवीराने २०१३ मध्ये गुजरातमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली होती.
२०१३ मध्ये गुजरात विद्यापीठातर्फे सुनीता विल्यम्स यांचा सन्मान करण्यात आला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात सुनीताने तिचा अप्रतिम अनुभव सांगितला होता. एका दिवसात १६ वेळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचे भाग्य मला लाभले. हा सगळा प्रकार वेगाने धावणाऱ्या स्पेस शटलमध्ये घडला होता.
आयएसएस ताशी २८ हजार किमी वेगाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालते. हे दर ९० मिनिटांनी एक प्रदक्षिणा पूर्ण करते. अंतराळ स्थानकाच्या इतक्या प्रचंड वेगामुळे अंतराळवीर पृथ्वीच्या अंधाऱ्या बाजूकडून प्रकाशाच्या बाजूकडे अतिशय वेगाने जातात. या लोकांना सुमारे ४५ मिनिटांच्या अंतराने सूर्योदय किंवा सूर्यास्त पाहण्याची संधी मिळते. पृथ्वीवरील दिवस आणि रात्र या १२ तासांच्या तुलनेत आयएसएसमधील अंतराळवीरांना दिवस आणि रात्र ४५-४५ मिनिटांचा अनुभव येतो.
अंतराळात नियमित दिवस-रात्र चक्र नसल्यामुळे अंतराळवीर झोपण्याच्या वेळेसाठी एक खास फॉर्म्युला वापरतात. समन्वित युनिव्हर्सल टाइम (यूटीसी) वर आधारित हे वेळापत्रक आहे. त्याआधारे अंतराळवीरांचे दिवसाचे काम, व्यायाम, जेवण आणि विश्रांतीची वेळ ठरवली जाते. अंतराळवीर अंतराळात आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी या वेळापत्रकांचे काटेकोरपणे पालन करतात.
संबंधित बातम्या