How Much Indian Government Earn by Liquor Taxes: देशात जेवणापासून ते रस्त्यावर चालण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी सरकार कर आकरते. नवीन वर्ष जवळ आले की, दारू विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. पंरतु, तुम्हाला माहिती आहे का? सरकार दारुच्या एका बाटलीवर किती कर आकरते. हे जाणून आश्चर्य वाटेल की, कोणत्याही राज्याच्या महसुलाचा मोठा हिस्सा दारूच्या विक्रीतून येतो. यामुळेच कोणतेही सरकार दारूबंदीसारखा निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करते. प्रत्यक्षात राज्याच्या महसुलाच्या १५ ते ३० टक्के महसूल मद्यविक्रीतून येतो.
मद्यविक्री हा कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत असतो. आकडेवारीवर नजर टाकल्यास गोवा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र ही राज्ये दारूवर कर आकरण्यात पुढे आहे. दरम्यान, २०२०-२१ मध्ये सरकारने उत्पादन शुल्कातून अंदाजे १ लाख ७५ हजार कोटी रुपये कमावले. या बाबतीत उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशने उत्पादन शुल्कातून ४१ हजार २५० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता.
जर एखाद्या व्यक्तीने दारूची बाटली विकत घेतली तर सरकारला किती पैसे मिळतील? या बाबत जाणून घेऊयात. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्याचे सरकार दारूच्या विक्रीवर वेगवेगळे कर वसूल करते. महाराष्ट्रात मिळणारी दारूची बाटली दुसऱ्या राज्यात तेवढ्याच किंमतीत मिळेल, याची शक्यता फार कमी असते. उत्पादन शुल्काव्यतिरिक्त, मद्यावर विशेष उपकर, वाहतूक शुल्क, लेबल, नोंदणी इत्यादी शुल्क आहेत. एखाद्या व्यक्तीने १००० रुपयांची दारूची बाटली विकत घेतल्यास त्यावर ३० ते ३५ टक्के कर आकारला जातो, म्हणजेच १००० रुपयांची दारूची बाटली विकत घेतली की, सरकारच्या तिजोरीत ३५० ते ५०० रुपये जमा होतात.
संपूर्ण जगात दारू पिणाऱ्यांची संख्या अब्जावधीत आहे. तरुणांमध्ये वाईन, बिअर किंवा इतर मद्य पिण्याची आवड झपाट्याने वाढत आहे. सण-उत्सव असो की नववर्षाचे सेलिब्रेशन, दारू पिण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. आजच्या काळात दारू हा लोकांच्या सेलिब्रेशनचा भाग झाला आहे. परंतु, अशा गोष्टींमुळे दारूचे व्यसन लागते आणि ते रोज दारू पिऊ लागतात. मात्र, दररोज दारू प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
तज्ज्ञांच्या मते, दररोज १-२ पेग अल्कोहोल पिण्याने आरोग्यास कोणतेही नुकसान होत नाही. पण बहुतेक लोक त्याहून अधिक दारू पितात. अनेक संशोधनांमध्ये अल्कोहोलचे काही फायदे देखील दर्शविले गेले आहेत. परंतु, यावर बरेच विवाद आहेत. आरोग्य तज्ञ दारू आरोग्यासाठी अत्यंत घातक मानतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नेही दारूबाबत एक अहवाल जारी केला होता, ज्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. किती प्रमाणात अल्कोहोल शरिरासाठी सुरक्षित आहे. त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो हे सांगण्यात आले होते.
संबंधित बातम्या