जेव्हा तुम्ही विंटेज कार पाहता तेव्हा तुम्ही तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना तिच्या किंमतीबद्दल नक्कीच विचार करता. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वातंत्र्यापूर्वी या विटेंज कारची किंमत किती असेल. सध्या सोशल मीडियावर एका जुन्या वृत्तपत्रामधील जाहीरातीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात शेवरोलेच्या दोन वाहनांची जाहिरात करण्यात आली. या कारची किंमत पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
शेवरोलेची एक जुनी वृत्तपत्र जाहिरात ऑनलाइन समोर आली, ज्यात शेवरोलेच्या कारची जाहिरात दिसत आहे. ही कार पाच सीटर कार आहे आणि त्यांची किंमत ३ हजार ६०० रुपये असल्याचे दिसते, जे आजच्या मॉडेल वाहनांच्या किमतींपेक्षा खूपच कमी आहे. आणखी एक कारची जाहिरात दाखवण्यात आली आहे, ज्याची किंमत २ हजार ७०० रुपये होती. पहिली जाहिरात लखनौमध्ये कारची उपलब्धता दर्शवते. तर, दुसरी कार कोलकाता, दिल्ली आणि दिब्रुगढ
सारख्या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होती.आज भारतातील सर्वात स्वस्त ५- सीटर कारची किंमत लाखोंमध्ये आहे. एवढेच नव्हेतर एवढ्या किंमतीत एखादा बजेट स्मार्टफोन खरेदी करणे कठीण आहे.
carblogindia या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या जाहिरातीचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक्स केले आहे. तर, आतापर्यंत लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.
या व्हायरल जाहिरातीमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत. या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका व्यक्तीने म्हटले आहे की, मी खूपच श्रीमंत व्यक्ती आहे. पण आता नाहीतर त्या काळतील. दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, अच्छे दिन त्याला म्हणायचे, मला अजूनही ते दिवस आठवतात. १९३६ मध्ये ३ हजार ६७५ रुपयांचे आताचे मूल्य ३ कोटी ६७ लाख ५० रुपये इतके आहे, असे एका व्यक्तीने म्हटले आहे.
संबंधित बातम्या