L&T Chairman Advocates 90-Hour Work Week: लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एलअँडटीचे अध्यक्ष एस.एन. सुब्रमण्यमच यांनी ९० तास काम करण्याबाबत केलेल्या विधानामुळे देशभरात वाद निर्माण झाला आहे. यातच भारताचा सर्वाधिक काम करणाऱ्या देशांमध्ये झाला, तेव्हा वर्क-लाइफ बॅलेंसबद्दलची चर्चा अधिकच तीव्र झाली. अशा परिस्थितीत कोणत्या देशात लोक आठवड्यातून सर्वात जास्त काम करतात आणि भारतातील लोक किती तास काम करतात, याबाबत जाणून घेऊयात.
एस.एन. सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यामुळे कामाच्या वेळेचा प्रश्न ऐरणीवर आला. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनने म्हणजेच आयएलओ नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात जगभरातील कामगारांची दुर्दशा अधोरेखित करण्यात आली आहे. यात असे दिसून आले आहे की, भारत हा आठवड्यात सर्वात जास्त काम करणाऱ्या देशांमध्ये आहे.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, पूर्णवेळ कर्मचारी एका आठवड्यात किंवा वर्षात किती तास काम करतात, याची संख्या देशानुसार मोठ्या प्रमाणात बदलते. काही देशांमध्ये, सरासरी पूर्णवेळ कामाचा आठवडा ४० तासांपेक्षा कमी असतो, तर इतरांमध्ये तो ५० तासांपेक्षा जास्त असू शकतो.
आयएलओच्या 'वेजेस अँड वर्किंग टाइम स्टॅटिस्टिक्स (सीओएनडी) डेटाबेस, आयएलओएसएटी' या अहवालात नमूद करण्यात आलेल्या क्रमवारीत भारत १३ व्या स्थानावर आहे. १२ व्या स्थानावर असलेल्या पाकिस्तानपेक्षा भारताची स्थिती थोडी चांगली असली तरी चीनच्या (१६ व्या स्थानाच्या) तुलनेत परिस्थिती वाईट आहे. ११ जानेवारी २०२४ रोजी अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात नोकरदार व्यक्ती दर आठवड्याला सरासरी ४६.७ तास काम करतो. भारतात काम करणाऱ्यांपैकी ५१ टक्के लोक आठवड्यातून ४९ किंवा त्याहून अधिक तास काम करतात.
S. No. | Country | Average hours per week per employed person | Share of employed working 49 or more hours per week |
1 | Bhutan | 54.4 | 61% |
2 | United Arab Emirates | 50.9 | 39% |
3 | Lesotho | 50.4 | 36% |
4 | Congo | 48.6 | 45% |
5 | Qatar | 48 | 29% |
6 | Liberia | 47.7 | 27% |
7 | Mauritania | 47.6 | 46% |
8 | Lebanon | 47.6 | 38% |
9 | Mongolia | 47.3 | 33% |
10 | Jordan | 47 | 34% |
11 | Bangladesh | 46.9 | 47% |
12 | Pakistan | 46.9 | 40% |
13 | India | 46.7 | 51% |
14 | Maldives | 46.5 | 32% |
15 | Burkina Faso | 46.3 | 41% |
16 | China | 46.1 | - |
17 | Macau, China | 46 | 14% |
18 | Brunei Darussalam | 46 | 23% |
19 | Kenya | 45.6 | 26% |
20 | Senegal | 45.5 | 17% |
आयएलओच्या २०२३ च्या 'वर्किंग टाइम अँड वर्क-लाइफ बॅलन्स अराउंड द वर्ल्ड' या अहवालात 'कामाचे दीर्घ तास' म्हणजे नियमितपणे आठवड्यातून ४८ तासांपेक्षा जास्त काम करणे अशी व्याख्या करण्यात आली आहे. ही व्याख्या संबंधित आंतरराष्ट्रीय कामगार मानके, कन्व्हेन्शन नंबर १ आणि कामाचे तास कन्व्हेन्शन, १९३० (क्रमांक ३०) शी सुसंगत आहे, ज्यात सामान्य कामाचे तास दर आठवड्याला ४८ पर्यंत मर्यादित आहेत. अहवालात असे दिसून आले आहे की, कोविड-१९ महामारी सुरू होण्यापूर्वी २०१९ मध्ये जगभरातील सुमारे एक तृतीयांश कर्मचारी (३५.४ टक्के) दर आठवड्याला ४८ तासांपेक्षा जास्त काम करायचे. यात दीर्घ तास पगारी काम करण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय लिंगभेद देखील अधोरेखित करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या