Google Maps helped trace stolen items: धावत्या ट्रेनमध्ये एका तरुणाने वडिलांची चोरीला गेलेली बॅग गूगल मॅपच्या मदतीने शोधून काढली. राज भगत पी असे संबंधित तरुणाचे नाव आहे. राजच्या वडिलांची बॅग धावत्या ट्रेनमधून चोरीला गेली. यानंतर राजने गुगल मॅपवरील लोकेशन शेअरिंग फीचरचा वापर करून चोरट्याचा शोधले आणि चोरलेल्या वस्तू परत मिळवल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, राज यांचे वडील नागरकोइल - काचेगुडा एक्स्प्रेसने स्लीपर क्लासमधून तामिळनाडूतील नागरकोइल ते त्रिची प्रवास करत होते. रात्री १ वाजून ४३ मिनिटांनी नागरकोइल जंक्शनवरून ते ट्रेनमध्ये चढले. ट्रेन तुलनेने रिकामी होती आणि माझ्या वडिलांसोबत चढलेल्या आणखी एका व्यक्तीने माझ्या वडिलांची बॅग आणि मोबाइल फोन चोरला आणि तिरुनेलवेली जंक्शनमध्ये ट्रेनमधून उतरला.
फोन आणि बॅग चोरीला गेल्याचे वडिलांना लक्षात येताच त्यांनी पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी मित्राच्या फोनवरून राजशी संपर्क साधला. यावेळी जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोबाईलमध्ये आमचे लोकेशन शेअरिंग ऑन असल्याचे राजला समजले. त्याने मोबाईल ट्रॅक केला असता मोबाइल तिरुनेलवेलीतील मेलापलायमजवळ रुळावरून फिरत असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि चोर दुसऱ्या ट्रेनने नागरकोइलला परतत असल्याचे समजले.
त्यानंतर राजने आपल्या मित्राला फोन केला आणि ते दोघे ही मदत मागण्यासाठी पोलिसांकडे गेले. पोलिस त्यांच्यासमवेत नागरकोइल स्थानकात गेले आणि चोर येण्याची वाट पाहत होते. राज पुढे म्हणाला की, "कन्याकुमारी एक्स्प्रेसमधून चोर स्टेशनवर आला होता, जिथे प्रचंड गर्दी होती. गर्दी असल्यामुळे चोराला शोधण्यात थोडी अडचण आली. पण तरीही मी त्याला शोधू शकलो. त्याच्या हालचालींच्या आधारे मला आढळले की, तो मुख्य गेटमधून बाहेर पडला. नागरकोइल रेल्वे स्थानकाबाहेरून त्याने लोकल बस पकडली. आम्ही दुचाकीवरून त्याचा पाठलाग सुरू केला.
अण्णा बसस्थानकावर राज आणि त्याचा मित्र चोरट्याच्या काही पावले मागे होते. २-३ मिनिटांनी गुगल मॅप्सने मला २ मीटरपर्यंत अचूक लोकेशन दिले. तेवढ्यात मी त्याच्या मागे उभा होतो आणि मी बॅगेवर काय लिहिलं आहे ते तपासले आणि त्यावर त्याच्या लोगोसह सीटू लिहिले होते. माझे वडील युनियनचे कार्यकर्ते आहेत. बसस्थानकात मी आणि माझ्या मित्राने चोराचा सामना केला आणि बसस्थानकातील इतर लोकांच्या मदतीने आम्ही माझ्या वडिलांचा फोन आणि बॅग जप्त केली, अशी माहिती राजने दिली
संबंधित बातम्या