Sundar Pichai : कशी होते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या दिवसाची सुरुवात?-how does google ceo sundar pichai start his morning ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Sundar Pichai : कशी होते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या दिवसाची सुरुवात?

Sundar Pichai : कशी होते गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या दिवसाची सुरुवात?

Feb 12, 2024 02:46 PM IST

Sundar Pichai : यशस्वी माणसांच्या दिनक्रमाबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. जाणून घेऊया सुंदर पिचाई यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते त्याबद्दल…

Sundar Pichai
Sundar Pichai (AP)

Sundar Pichai : काही लोकांची सुरुवात वाफाळत्या चहासोबत होते, काही लोक त्यांचं आवडतं वर्तमानपत्र वाचून तर काही लोक त्यांची आवडती वेबसाइट चाळून दिवसाची सुरुवात करतात. मात्र, वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व करणारे अब्जाधीश, मोठे उद्योगपती, कंपन्यांचे सीईओ यांचा दिवस कसा सुरू होतो? याबद्दल सर्वांनाच कुतूहल असतं. यापैकी काही लोकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया…

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याबद्दल लोकांना विशेष आकर्षण आहे. त्यांचं भारतीय असणं हे देखील त्यामागील एक कारण आहे. सुंदर पिचाई यांची सकाळ काहीशी वेगळी असते. सुंदर पिचाई हे सकाळी उठल्यावर सोशल मीडिया किंवा वर्तमानपत्रं पाहत नाहीत. ते आपला दिवस ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ किंवा ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ सारखी वर्तमानपत्रं किंवा त्यांच्या वेबसाइट्स पाहून दिवस सुरू करत नाहीत. त्याचा दिवस तंत्रज्ञान जगतातील ताज्या बातम्यांनी सुरू होतो. ते Techmeme ही वेबसाईट पाहतात, अशी सूत्रांची माहिती आहे. 

टेकमीमचे इतरही चाहते

सुंदर पिचाई यांच्या शिवाय फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग देखील 'टेकमीम' ही वेबसाइट वाचतात. मेटाचे सीटीओ अँड्र्यू बॉसवर्थ आणि इन्स्टाग्रामचे प्रमुख ॲडम मोसेरी यांना देखील ही वेबसाइट आवडते.

ॲपलचे सीईओ टिम कुक यांची सकाळी कशी होते?

ॲपलचे सीईओ टिम कुक हे ई-मेलवर आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया वाचून आपल्या दिवसाची सुरुवात करतात. याशिवाय Spotify चे सीईओ डॅनियल ईके दिवसाची सुरुवात बातम्या आणि पुस्तक वाचून करतात.

काय आहे टेकमीम?

टेकमीम ही एक वेबसाइट आहे. ही वेबसाइट गॅबे रिवेरा यांनी २००५ साली सुरू केली. विविध प्रकाशनांमधील तंत्रज्ञानाच्या बातम्या या वेबसाइटवर एकत्र वाचायला मिळतात. ही वेबसाइट संक्षिप्त स्वरूपात आणि मूळ लेखांच्या लिंक्ससह तांत्रिक बातम्यांची यादी प्रसिद्ध करते. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या वाचकांना वेगवेगळ्या साइटवर जाण्याऐवजी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळते. पिचाई यांनी 'वायर्ड'ला नुकतीच एक मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी 'टेकमीम'चा उल्लेख केला.

ही वेबसाइट क्लिकबेटचा वापर करत नाही. या वेबसाइटवर वाचन करताना पॉपअप, व्हिडिओ किंवा जाहिरातींचा अडथळा येत नाही. येथील बातम्यांचे मथळे तपशीलवार, स्पष्ट असतात. सहज समजेल असा बातमीचा सारांशही वेबसाइटवर वाचायला मिळतो. त्यामुळंच ही वेबसाइट लोकप्रिय आहे, असं मत खुद्द वेबसाइटचे संस्थापक गॅबे रिवेरा यांनी बिझनेस इनसाइडरशी बोलताना व्यक्त केलं होतं.  

विभाग