Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांचा ९ वर्षाचा नातूही आहे करोडपती, ‘या’ शेअरमुळे केली ६ दिवसात बंपर कमाई
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांचा ९ वर्षाचा नातूही आहे करोडपती, ‘या’ शेअरमुळे केली ६ दिवसात बंपर कमाई

Chandrababu Naidu : चंद्राबाबू नायडू यांचा ९ वर्षाचा नातूही आहे करोडपती, ‘या’ शेअरमुळे केली ६ दिवसात बंपर कमाई

Jun 12, 2024 04:43 PM IST

Heritage Foods Stock: चंद्राबाबू नायडू यांच्या कुटुंबाची मालकी असलेल्या हेरिटेज फूड्स या डेअरी कंपनीच्या शेअरने निवडणुकीच्या निकालानंतर विक्रमी उच्चांक गाठला आहे. यामुळे कुटूंबातील लहान मुलेही करोडपती झाली आहेत.

चंद्राबाबू नायडू यांचा ९ वर्षाचा नातूही आहे करोडपती
चंद्राबाबू नायडू यांचा ९ वर्षाचा नातूही आहे करोडपती

Heritage Foods Stock: तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) याचे नशीब लोकसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर पालटले आहे. त्यांच्या कुटूंबाची मालकी असलेली  कंपनी, हेरिटेज फूड्स चे शेअर एक्झिट पोलच्या कलानंतर रॉकेट प्रमाणे झेप घेत आहेत. मागील काही दिवसांपासून या शेअरमध्ये सतत अपर सर्किट लागताना दिसून येत आहे. या तेजीला या गोष्टीचाही सपोर्ट मिळाला आहे की,  चंद्राबाबू नायडू केवळ आंध्र प्रदेशमध्येच सरकार बनवत नसून केंद्रात  NDA सरकार स्थापन करण्यातही त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.

तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज चौथ्यांदा आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. जनसेना प्रमुख आणि अभिनेते पवन कल्याण, चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडू यांचे नशीब चांगलेच फळफळले आहे. त्यांच्या कुटुंबाने प्रवर्तित केलेल्या हेरिटेज फूड्स या डेअरी कंपनीच्या शेअरने विक्रमी उच्चांक गाठला आहे. टीडीपी एनडीए सरकारमध्येही महत्वाचा घटक पक्ष आहे.  हेरिटेज फूड्सचा शेअर १२ सत्रात दुप्पट झाला आणि त्यामुळे चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा फायदा झाला, ज्याचा कंपनीत ३५.७ टक्के हिस्सा आहे. एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, कंपनीत त्यांची पत्नी भुवनेश्वरी यांची २४.३७ टक्के, मुलगा लोकेशची १०.८२ टक्के, सून ब्राह्मणीची ०.४६ टक्के आणि  ९ वर्षीय नातू देवांशची ०.०६ टक्के हिस्सेदारी आहे.

शेअरमध्ये तेजी आल्यानंतर देवांशचे ५६,०७५ शेअर्स आता ४.१ कोटी रुपयांवर पोहोचले आहेत, जे ३ जून रोजी २.४ कोटी रुपये होते. बीएसईवर हेरिटेज फूड्सच्या शेअरने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ७२७.९ रुपयांवर पोहोचल्याने कुटुंबाला १,२२५ कोटी रुपये मिळाले.  २३ मे रोजी हा शेअर ३५४.५ रुपयांवर बंद झाला.

हेरिटेज फूड्सची स्थापना १९९२ मध्ये झाली आणि ही भारतातील अग्रगण्य मूल्यवर्धित आणि ब्रँडेड डेअरी उत्पादने देणारी कंपनी आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये दही, तूप, पनीर, फ्लेवर्ड मिल्क आणि इम्युनिटी मिल्क यांचा समावेश आहे. कंपनीचा दावा आहे की भारतातील ११ राज्यांमधील १५ लाखांहून अधिक कुटुंबे ही उत्पादने वापरतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर