Viral Video : अभ्यास न करता जिल्हाधिकारी कसं व्हाल?, तरुणीच्या भन्नाट उत्तराचा व्हिडिओ व्हायरल!
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral Video : अभ्यास न करता जिल्हाधिकारी कसं व्हाल?, तरुणीच्या भन्नाट उत्तराचा व्हिडिओ व्हायरल!

Viral Video : अभ्यास न करता जिल्हाधिकारी कसं व्हाल?, तरुणीच्या भन्नाट उत्तराचा व्हिडिओ व्हायरल!

Published Mar 28, 2023 01:48 PM IST

Viral Video On Social Media : कोणताही अभ्यास न करता आयएएस होण्यासाठी काय करावं?, या प्रश्नाचं उत्तर व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणीनं दिलं आहे.

Tina Dabi IAS
Tina Dabi IAS (HT)

Viral Video On Social Media : भारतातील सर्वात अवघड आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या यूपीएससीची परिक्षा पास झाल्यानंतर अनेकांचं आयएएस अर्थात जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होत असतं. त्यासाठी अनेक तरुण-तरुणी लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लावतात. कठोर मेहनत घेत रात्रंदिवस एकत्र करून परिक्षेला सामोरं जातात. जिल्हाधिकारी होण्यासाठी तरुणाई कठोर परिश्रमासह अनेक पातळ्यांवर मानसिक संघर्ष करत असते. परंतु अभ्यास न करता जिल्हाधिकारी होऊ शकता, असं कुणी म्हटलं तर त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात अभ्यास न करता आयएएस कसं व्हायचं याचं सूत्र तरुणीनं सांगितलं आहे. त्यामुळं त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

यूपीएससी नोट्स या ट्वीटर अकाऊंटवरून व्हायरल व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. त्यात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या तरुणीला युजर्सने अभ्यास न करता जिल्हाधिकारी कसं व्हावं?, असा प्रश्न केला. त्यानंतर तरुणीनं क्षणाचाही विलंब न करता 'अभ्यास न करता जिल्हाधिकारी केवळ स्वप्नातच होऊ शकता', असं मजेशीर उत्तर दिलं. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तरुणीचं उत्तर ऐकून अनेकांना हसू अनावर झालं. त्यानंतर अनेकांनी व्हायरल व्हिडिओ शेयर करत कष्टाला पर्याय नाही, हे ठणकावून सांगितलं आहे. तरुणीच्या भन्नाट प्रतिक्रियेच्या व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स केल्या असून लाखोंच्या संख्येनं लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आहे.

दरवर्षी यूपीएससीची परिक्षा पास करत जिल्हाधिकारी झालेले उमेदवार त्यांच्या संघर्षाची कहानी सांगत असतात. याशिवाय अनेकांना कलेक्टर होण्यासाठी काही वर्ष कठीण मेहनत घ्यावी लागते. काहीही न करता अथवा कोणताही अभ्यास न करता तुम्ही जिल्हाधिकारी होऊ शकत नाही, असा संदेश तरुणीनं व्हायरल व्हिडिओतून दिला आहे. त्यामुळं अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देत आपापली मतं नोंदवली आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर