Bird Strike on Flight : य वर्षात अनेक मोठे विमान अपघात झाले. सर्वात मोठे अपघात हे डिसेंबर महिन्यात झाले. एम्ब्रेर ई १९० एआर विमानाचा २५ डिसेंबर रोजी कझाकस्तानमधील अकताऊ शहरापासून सुमारे ३ किमी अंतरावर अपघात झाला. रशियाच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेमुळे हे विमान कोसळले. या विमानातील ६७ पैकी ३८ जणांचा मृत्यू झाला तर २९ जण वाचले. ४ दिवसांनी म्हणजेच २९ डिसेंबर रोजी दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर देखील भीषण विमान अपघात झाला. हे विमान क्रॅश होण्यापूर्वी वाहतूक नियंत्रकाने बर्ड स्ट्राइकचा अलर्ट पाठवला होता. विमानातील १८१ लोकांपैकी फक्त २ वाचले. तर उर्वरित सर्व १७९ जणांचा या घटनेत मृत्यू झाला.
दक्षिण कोरियात झालेल्या विमान अपघात हा एका छोट्या पक्ष्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आकाशात पक्षी विमानाला धडकल्याने विमानाचे लँडिंग गिअर निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशा तऱ्हेने लँडिंगदरम्यान विमान धावपट्टीवर घसरले व विमानाला आग लागली. या दुर्घटनेत विमानातील १७९ जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ तिघांना जिवंत या दुर्घटनेतून वाचवण्यात यश आले आहे. पक्ष्यांच्या हल्ल्यामुळे अनेकदा विमान अपघात होतात. विमानाला पक्षी धडकल्याने एवढं मोठ विमान कसं कोसळतं? बर्ड स्ट्राईकमुळे विमान अपघात कसे होतात? याची माहिती घेऊयात.
विमानाच्या लँडिंग किंवा टेकऑफ दरम्यान कमी उंचीवर उडणारे पक्षी विमानाला धडकल्यास त्याला बर्ड स्ट्राईक म्हणता. हे बर्ड स्ट्राईक विमानासाठी धोकादायक असतात. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता असते. धडक झाल्यावर अपघात होईलच याची शास्वती नसते. विमानाच्या वरच्या भागावर पक्षी आदळल्यास किंवा धडकल्यास विमानाला काही अडचण येत नाही. मात्र, लँडिंगदरम्यान विमानाचा वेग हा तुलनेने कमी असतो. मात्र, उड्डाणादरम्यान पक्ष्यांच्या धडकेमुळे विमानाचा वेग खूप जास्त असल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी पक्षी आणि विमानाचा सापेक्ष वेग खूप जास्त होतो आणि हाच वेग भल्या मोठा विमानाचा अपघात होण्यास कारणीभूत ठरतात.
विमानाच्या इंजिनात पक्षी शिरला तर आग लागण्याची किंवा मोठा बिघाड होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर विमानावर नियंत्रण ठेवण्यातही वैमानिकाला अडचणी येऊ शकतात. अशा स्थितीत विमानाला इमर्जन्सी लॅंडींग करण्याची वेळ येऊ शकते. इंजिनमध्ये पक्षी अडकला तर जेड इंजिनाच्या पंख्याच्या ब्लेडचे नुकसान होऊ शकते.
२००९ मध्ये अमेरिकेत एका विमानाच्या उड्डाणानंतर ते विमान काही वेळेतच पक्ष्यांच्या एका कळपाला जाऊन धडकले. यामुळे या विमानाचे दोन्ही इंजिन निकामी झाले. यानंतर हे विमान एका नदीत उतरावे लागले. या विमानातील सर्व १५५ प्रवासी सुखरूप बचावले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लहान विमाने कमी उंचीवर उडतात त्यामुळे त्यांना पक्ष्यांची धडक होण्याची शक्यता जास्त असते.
विमानतळाभोवती पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्ष्यांची धडक होऊन अपघात होऊ शकतात. याशिवाय पावसाळ्यात आकाशात कीटक देखील उडू लागतात. त्यामुळे विमानांना पक्ष्यांची धडक सर्वाधिक होऊ शकते. त्यामुळे पक्ष्यांच्या धडकेमुळे लँडिंग गिअर खराब झाल्यास अशा स्थितीत विमानाचे बेली लँडिंग केलं जातं. लॅंडींगची ही प्रक्रिया अतिशय धोकादायक आहे. दक्षिण कोरियात विमानाचा लॅंडींग गियर खराब झाल्याने बेली लँडिंग करावे लागले. यात ही मोठी दुर्घटना घडून १७९ प्रवाशांना जीवाला मुकावे लागले.
संबंधित बातम्या