Man Kills Wife in Karnataka Kolar : कर्नाटकच्या कोलार येथून सगळ्यांना हादरून टाकणारी घटना उघडकीस आली. लग्नाच्या काही तासांतच नवविवाहित दाम्पत्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर नातेवाईकांनी दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी वधूला मृत घोषित केले. तर, वराला उपचारांसाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्याचाही आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. लग्नानंतर वधू-वरामध्ये भांडण झाले असावे. यानंतर वराने वधूची हत्या करून स्वत:वरही कुऱ्हाडीने वार केल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
नवीन कुमार आणि लिखिता श्री असे मृत नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. नवीन आणि लिखिता यांचा विवाह सोहळा ७ ऑगस्ट २०२४ रोजी धुमधडाक्यात संपन्न झाला. या सोहळ्याला दोघांचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. लग्न सोहळा संपन्न झाल्यानंतर दोन्ही कुटुंबं एका नातेवाईकाच्या घरी चहा प्यायला गेला. मात्र, घरी परतल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य बराच वेळ न दिसल्याने नातेवाईकांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा नवीन आणि लिखिता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु, तिथल्या डॉक्टरांनी लिखिताला मृत घोषित केले. त्यावेळी नवीन जिवंत असल्याने त्याला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, आज सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य आणि पाहुणे चहा प्यायला नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर नवीन आणि लिखिता यांच्यात काही कारणावरून वाद झाला. शाब्दिक वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. यानंतर नवीनने कुऱ्हाडीने लिखितावर हल्ला केला. नंतर स्वत:वरही वार करून घेतले, असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयाने एका २५ वर्षीय तरुणाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित सहरावत हे गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन होते आणि आता प्रौढ गुन्हेगार म्हणून खटला चालवत होते. खंडपीठाने या व्यक्तीला बलात्कार आणि खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले. 'सध्याच्या प्रकरणात, कायद्याच्या संघर्षातील चिमुकलीवर गंभीर घटक म्हणजे प्रथम त्याने केवळ ५ वर्षांच्या मुलावर बलात्कार केला आहे आणि त्यानंतर संबंधित मुलाच्या डोक्यावर दगड मारून निर्दयीपणे तिचा मृत्यू केला आहे,' असे न्यायालयाने म्हटले आहे.