मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indigo Flight : काटे-चमचे घेऊन हॉटेल मालकाचा विमान प्रवास, त्यानंतर जे घडलं..
काटे-चमचे घेऊन हॉटेल मालकाचा विमान प्रवास
काटे-चमचे घेऊन हॉटेल मालकाचा विमान प्रवास

Indigo Flight : काटे-चमचे घेऊन हॉटेल मालकाचा विमान प्रवास, त्यानंतर जे घडलं..

20 September 2022, 21:01 ISTShrikant Ashok Londhe

प्रयागराज विमानतळावर सुरक्षेत हलगर्जीपणा समोर आली आहे. येथे एक हॉटेल मालक केवळ जेवण घेऊन विमानात चढला नाही तर त्याने सोबत काटे व चमचेही घेतले होते. विमान हवेत झेपावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विमानत खळबळ माजली.

प्रयागराज विमानतळावर सुरक्षेत हलगर्जीपणा समोर आली आहे. येथे एक हॉटेल मालक केवळ जेवण घेऊन विमानात चढला नाही तर त्याने सोबत काटे व चमचेही घेतले होते. विमान हवेत झेपावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर विमानत खळबळ माजली. त्यानंतर दिल्लीला जाणारे विमान पुन्हा प्रयागराजकडे वळवण्यात आला. पुन्हा तपासणी केल्यानंतर विमान दिल्लीकडे रवाना झाले. अधिकाऱ्यांनी ही सुरक्षेतील मोठी चूक मानत चौकशी सुरू केली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

प्रयागराजमधील रहीमाबाद स्थित बमरौली एअरपोर्टवर सोमवारी दुपारी साडे बारा वाजता इंडिगो विमान दिल्लीकडे रवाना झाले होते. विमान उड्डाण केल्यानंतर समजले की, यामध्ये प्रवास करणाऱ्या प्रयागराजमधील एका हॉटेलच्या मालकाने आपल्या सोबत काटे व चमच घेतले आहे. विमानामध्ये बाहेरचे खाणे व काटा-चमचे प्रतिबंध असतानाही पाहून कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. 

या माहिती वैमानिकाला झाल्यानंतर त्यांनी विमान तात्काळ परत प्रयागराजकडे वळवले व एटीसीशी संपर्क करून सुरक्षित लँडिंग केली. त्यानंतर काटे चमचे बाहेर काढून सर्व प्रवाशांना घेऊन विमानाने पुन्हा दिल्लीकडे उड्डाण केले. 

अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे. गाइडलाइननुसार कोणीही तीन इंचाहून अधिक लांबीची व टोकदार वस्तू विमानात घेऊन जाऊ शकत नाही. एअरपोर्टवर लावलेल्या एक्स-रे मशीनच्या माध्यमातून हे न पकडणे सुरक्षा व्यवस्थेतील मोठी चूक मानली जात आहे. 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook