थंडी आणि धुक्यामुळे अनेक अपघात होत असून लोकांचा जीव जात आहे. उत्तरप्रदेशातील शाहजहापूरमध्ये झालेल्या भीषण अपघातात १२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. गंगा स्नानासाठी जात असलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची भीषण धडकली. हा अपघात गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता झाला. शाहजहापूरमधील मदनापुर क्षेत्रातील दमगडा गावातील भाविक पौष पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला अपघाता झाला.
बरेली-फर्रुखाबाद महामार्गवर हा अपघात झाला. ऑटोमधून १२ लोक प्रवास करत होते. या अपघातात ऑटो चालकासह सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.
शहाजहांपूरमधील दमगड़ा गावातील लोक ऑटोमधून गंगा स्नान करण्यासाठी फर्रुखाबाद येथील पांचाल घाटाकडे जात होते. अल्हागंजच्या सुगसुगी गावाजवळ बरेली-फर्रुखाबाद हायवे वर समोरून येणाऱ्या ट्रकने ऑटोला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षाचा चक्काचूर झाला. यामधील सर्व १२ लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये आठ पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा समावेश आहे.
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ट्रकने धडक दिल्यानंतर ऑटोमधील ५-६ लोक रस्त्यावर पडले होते. त्यांचा जीव वाचवता आला असता. मात्र ट्रक चालकाने अपघातनंतर या लोकांच्या अंगावरून ट्रक घातला. लोक जमा होताच चालक ट्रक सोडून पसार झाला.