bus accident in nuh : हरियाणातील नूह येथे पर्यटकांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. नूह जिल्ह्यातील तवाडू उपविभागाच्या सीमेवरून जाणाऱ्या कुंडली मानेसर पलवल एक्सप्रेसवेवर ही घटना घडली. या बसमध्ये सुमारे ६० प्रवासी प्रवास करत होते. या अपघातानंतर या बसला मोठी आग लागी असून या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर २४ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री दीडच्या सुमारास झाला. बसमध्ये प्रवास करणारे बहुतेक प्रवासी देवदर्शनासाठी गेले होते. हे प्रवासी बनारस आणि वृंदावन येथून दर्शंन घेऊन परत येत असतांना त्यांच्यावर काळाने घाला घातला.
हरियाणातील नूह येथे शुक्रवारी रात्री उशिरा एका पर्यटक बसला लागलेल्या आगीत आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात सुमारे २४ जण जखमी झाले आहेत. ही घटना रात्री उशिरा दीड वाजता घडली. बसमध्ये सुमारे ६० जण होते. व्हिडीओ फुटेजमध्ये, बस आगीच्या भक्ष्यस्थानी आणि उड्डाणपूल किंवा पुलासारखी दिसत असलेल्या ठिकाणी उभी आहे.
बसमध्ये प्रवास करणारे पंजाब आणि चंदीगड येथील भाविक मथुरा वृंदावन येथून परतत होते. केएमपी एक्स्प्रेस वेवर नूह जिल्ह्यातील तावडू उपविभागात पोहोचताच हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य करण्यात आले. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले.
बसला आग लागली तेव्हा चालक हा गाडी चालवत होता. चालकाला बसला आग लागल्याचे कळले नाही. एका दुचाकी चालकाला रस्तावरून जाताना बसला आग लागल्याचे दिसले. त्याने दुचाकी भरधाव चालवत बसला ओव्हरटेक करत बस चालकाला आग लागल्याचे चालकाला सांगितले.
इंडिया टुडेला बसमधील एका वृद्ध प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आग लागल्याचे समजताच त्याने बसमधून उडी मारली आणि स्वत:ला वाचवले. एकाने सांगितले की, बस जात असतांना जळण्याची दुर्गंधी येऊ लागली. यानंतर ही गाडी थांबवण्यात आली. एका महिलेने सांगितले की, या गाडीत तिचे अनेक नातेवाईक प्रवासी होते. सर्व जण पंजाबमधील होशियारपूरचे रहिवासी होते. त्यांनी सांगितले की सर्वजण ७ ते ९ दिवसांच्या यात्रेला गेले होते. ही यात्रा पूर्ण करून ते घरी परतत होते.
संबंधित बातम्या