मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भयंकर बदला.. पुतणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बहिणीवर घरात घुसून बलात्कार

भयंकर बदला.. पुतणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बहिणीवर घरात घुसून बलात्कार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 18, 2024 11:50 PM IST

Nationl Crime news :चुलत पुतणीवर झालेल्या अत्याचाराने संतप्त झालेल्या चुलत्याने आरोपीचा बदला घेण्यासाठी भयंकर षड्यंत्र रचले.

पुतणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या विवाहित बहिणीवर बलात्कार
पुतणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीच्या विवाहित बहिणीवर बलात्कार

उत्तरप्रदेशमध्ये बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. पुतणीवर केलेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी चुलत्याने आरोपी तरुणाच्या बहिणीवर बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. ३ मार्च रोजी एका विवाहितेवर गावातीलच एका तरुणाने बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी ६ मार्च रोजी आरोपीला अटक केली होती. 

चुलत पुतणीवर झालेल्या अत्याचाराने संतप्त झालेल्या चुलत्याने आरोपीचा बदला घेण्यासाठी भयंकर षड्यंत्र रचले. त्याच्या विवाहित बहिणीवर १३ मार्च रोजी घरात घुसून बलात्कार केला. पीडितेने पोलिसांना सांगितले की, आरोपीकडे तिचा फोटो व व्हिडिओ होता. तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने घराच्या छतावर बोलावून तिच्यावर अत्याचार केला. 

बलात्काराच्या पहिल्या घटनेत पोलिसांनी केवळ छेडछाडीचे कलम लावून गुन्हा नोंद केला होता. पीडितेने न्यायालयात साक्ष देताना सांगितले की, तिच्यावर बलात्कार झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचे कलम लावले व आरोपींना अटक केली. आरोपी तुरुंगात जाताच पीडितेच्या काकाने या बलात्काराचा बदला घेण्याचा डाव रचला. 

१४ मार्च रोजी त्याला गुन्हा नोंद करून आरोपीला सोमवारी अटक करण्यात आली. बलात्काराचा बदला बलात्कार करून घेतल्याच्या वृत्ताने समानमन सुन्न झाले आहे. परिसरात ही घटना हा चर्चेता विषय ठरली आहे. दोन्ही बलात्कार पीडित महिला विवाहित आहेत. यावरूनही अनेक चर्चा होत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग