UP Accident : भयंकर अपघात! बसला कापत निघून गेला ट्रक; ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  UP Accident : भयंकर अपघात! बसला कापत निघून गेला ट्रक; ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

UP Accident : भयंकर अपघात! बसला कापत निघून गेला ट्रक; ७ जणांचा मृत्यू, २५ जखमी

Apr 28, 2024 07:08 PM IST

UP Road Accident : उन्नाव येथे ट्रक व बसमध्ये झालेल्या अपघातात ट्रक बसची एक बाजू कापत पुढे निघून गेला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत.

बसला कापत निघून गेला ट्रक
बसला कापत निघून गेला ट्रक

Horrible accident in unnao up : यूपीमधील उन्नाव येथे रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. समोरा-समोर झालेल्या धडकेत ट्रकने बसला एका बाजुने अक्षरश: कापत नेले. या अपघातात सात लोकांचा मृत्यू झाला आहे तर २५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सर्व जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्वांना जिल्हा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. 

हा अपघात सफीपूर कोतवाली परिसरात जमल्दीपूरजवळ झाला. पोलिसांनी सात जणांच्या मृत्यूची पुष्टि केली आहे. तीन लोकांची ओळख पटली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बांगरमऊकडून उन्नावकडे येत असलेल्या खासगी बसला हा अपघात झाला. ही खासगी बस सफीपुर कोतवाली परिसरात जमल्दीपूर गावाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने जोरात धडक दिली. धडक मारल्यानंतर बसला एका बाजुने कापत पुढे निघून गेला. 

अपघातानंतर घटनास्थळी जखमींच्या किंकाळ्या ऐकून लोकांची गर्दी जमली. जखमी लोक बसमधून बाहेर लटकलेली दिसत होते. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमींना तत्काळ सीएचसी सफीपूरमध्ये दाखल केले. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर ५ अन्य लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनेतर ट्रक चालक फरार झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली आहे.

जखमींवर सफीपूर सीएचसी आणि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना अलर्ट करण्यात आले आहे. जखमी व मृतांचे ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. अपघात इतका भीषण होता की, एक प्रवासी हवेत उडून रस्त्यावर आपटला. यात त्याचे डोके फुटले. इतकेच नव्हे तर दोन प्रवाशांचे डोके तुटून बाजुला पडले होते. 

कार झाडावर आदळून नदीत बुडाली, बाप-लेकाचा मृत्यू -

नागपूर (Nagpur) जिल्ह्यात कळमेश्वर पोलिस ठाण्याच्या (Kalameshwar Police Station) हद्दीत शु्क्रवारी कार नदीत कोसळल्याने भीषण अपघात घडला. कळमेश्वर येथील रथयात्रा व मिरवणूक बघण्यासाठी गेलेल्या वडिलांना घरी परत आणताना बाप- लेकावर काळाने घाला (Father and son dies) घातला. तर, एकजण जखमी झाला. जखमीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर