बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं

बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं

Published Sep 07, 2024 08:29 PM IST

Hooghly Haripal Rape Case : बंगाल येथे कोलकता येथील डॉक्टरवर बलात्कार व हत्या प्रकरण ताजे असतांना हुगळी जिल्ह्यात १५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हरिपाल परिसरात ही मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली असून, ती विवस्त्र अवस्थेत होती.

बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं
बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं

Hooghly Haripal Rape Case : पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात १५ वर्षांच्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेने बंगालमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर बलात्कार करून तिला बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आलं. वृत्तानुसार, पीडित मुलगी ही शिकवणी वर्गावरून परत घरी जात असतांना काही नराधमांनी तिचं कारमध्ये अपहरण केलं. यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत फेकून देण्यात आलं.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, हरिपाल भागात पीडित मुलगी ही बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिचे कपडे फाटलेले होते. मुलीवर स्थानिक रुग्णालयात उपचार आणि वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झाल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पश्चिम बंगाल पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, या प्रकरणात सध्या कोणीही संशयित नसून तपासादरम्यान कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी जनतेला मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे आणि अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील दिला आहे.

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ?

या घटनेने पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. ही घटना लपवण्याचा पोलिसांचा प्रयत्न केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, "ममता बॅनर्जींच्या पोलिसांनी रुग्णालयाला वेढा घातला आहे. रुग्णालयात माध्यमांना प्रवेश दिला जात नाही. स्थानिक टीएमसी नेते परिस्थितीवर जबरदस्तीने नियंत्रण ठेवत आहेत, जेणेकरून घटनेची माहिती कुणालाही मिळू नये. मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि राज्य हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित ठिकाण असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. या बाबत त्यांनी ट्विट केले की, "ममता बॅनर्जी अयशस्वी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. त्यांनी बलात्कार आणि POCSO प्रकरणे सोडवण्यासाठी जलदगती न्यायालयेही तयार केलेली नाहीत. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहे.

कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणावरही जनक्षोभ वाढत आहे. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी एका दिवसानंतर आरोपी संजय रॉय यांना कोलकाता पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत आहे. कोलकाता घटनेनंतर हुगळीत झालेल्या क्रूरतेने कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून ममता सरकारला पुन्हा एकदा गोत्यात आणले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर