Honey Bees Attack : मंदिरात जाताना भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १ ठार, १४ जण जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Honey Bees Attack : मंदिरात जाताना भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १ ठार, १४ जण जखमी

Honey Bees Attack : मंदिरात जाताना भाविकांवर मधमाशांचा हल्ला; १ ठार, १४ जण जखमी

Published Apr 02, 2024 10:57 PM IST

Honey Bees Attack : मंदिरात जात असलेल्या भाविकांच्या वाहनावर मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तर १४ जण जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मंदिरात जाताना भाविकांवर मधमाशांचा हल्ला
मंदिरात जाताना भाविकांवर मधमाशांचा हल्ला

मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे तर १४ जण जखमी झाले आहेत. पिलुआ महावीर मंदिरात ध्वज लावण्यासाठी जात असलेल्या भाविकांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून १४ लोक जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील इटावा येथे घडली.

इटावामधील जसवंतनगरमधील नगला नया गावातील राधे श्याम यांचे कुटूंब मंगळवारी दुपारच्या सुमारास मंदिरावर ध्वज चढवण्यासाठी जात होते. पिलुआ महावीरमध्ये झेंडा घेऊन जाण्यासाठी कुटूंब व गावातील लोक तीन ट्रॅक्टर व दोन लोडरमधून जात होते. ४० ते ४५ लोक ट्रालीमध्ये बसले होते. तरुण नाच गाणी करत जात होते. लोडरमध्ये मोठ्या आवाजात भजन सुरू होते. 

दुपारी ३ वाजता ते सिव्हिल लाईन पोलीस ठाणे क्षेत्रातील पूठन सकरौली व सिंघावली गावादरम्यान एका पिंपळाच्या झाडावर मधमाशांचे पोळे होते. भाविक झाडाजवळ पोहोचल्यानंतर डीजेच्या मोठ्या आवाजाने मधमाशांनी भाविकांवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी भाविक इकडे-तिकडे पळू लागले. 

डीजेच्या आवाजाने आक्रमक झालेल्या मधमाशांनी राधेश्याम यांच्या कुटूंबातील ७० वर्षीय तुळसीराम यांच्यासह १५ लोकांवर हल्ला करत त्यांच्या शरीरावर जखमा केल्या. या हल्ल्यात तुळसीराम जमिनीवर पडले. त्यानंतर त्यांच्या संपूर्ण शरीरावर बसून मधमाशांनी  चावा घेत त्यांनी गंभीर जखमी केले. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी तुळसीराम यांच्यासह महिला, पुरुष व लहान मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान  तुलसीदास यांचा मृत्यू झाला तर १४ जणांवर उपचार सुरू आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर