मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Penal Code : १ जुलैपासून देशात लागू होणार ३ नवीन फौजदारी कायदे, काय होणार मोठे बदल?

Indian Penal Code : १ जुलैपासून देशात लागू होणार ३ नवीन फौजदारी कायदे, काय होणार मोठे बदल?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 24, 2024 06:13 PM IST

New Criminal Law : १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिसूचनाप्रसिद्ध करण्यात आली आहे. यानुसार आयपीसी कलम हटणार आहे.

newly enacted criminal laws to come into effect from July 1
newly enacted criminal laws to come into effect from July 1

देशात १ जुलैपासून तीन नवीन फौजदारी कायदे लागू केले जाणार आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सरकारी अधिसूचनेनुसार तीन नव-अधिनियमित फौजदारी न्याय कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू केले जातील. नव्या कायद्यांमध्ये भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyay Sanhita ), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (Bharatiya Nagrik Suraksha Sanhita) आणि भारतीय साक्ष्य अधिनियम (Bharatiya Saksha Adhiniyam) – २१ डिसेंबर रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरी देण्यात आली होती. 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी २५ डिसेंबर रोजी यावर स्वाक्षरी करून याला कायद्याचे रुप दिले होते. हे कायदे ब्रिटिश कालीन भारतीय दंड संहिता (Indian Penal Code) , फौजदारी प्रक्रिया संहिता (Criminal Code Procedure)  आणि १८७२ च्या भारतीय पुरावा अधिनियमाची (Indian Evidence Act) जागा घेतील. नव्या कायद्यात ३०२ हत्येचे कलम असणार नाही. त्याचबरोबर फसवणुकीसाठी ४२० चे कलम आता ३१६ होईल. 

नव्या भारतीय न्याय संहितेत २० नवीन गुन्हे समाविष्ट करण्यात आले आहेत. तर आयपीसीमधील १९ तरतुदी काढून टाकण्यात आल्या आहेत. तसेच ३३ गुन्ह्यांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा वाढवण्यात आली आहे. तर ८३ तरतुदींमध्ये दंडाच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे, याशिवाय २३ गुन्ह्यांमध्ये अनिवार्य किमान शिक्षेची तरतूद करण्यात आली असून, ६ गुन्ह्यांमध्ये 'सामुदायिक सेवा' या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.  

नवीन तीन कायद्यात काय झालेत बदल -

भारतीय न्याय संहिता – 

आयपीसीमध्ये ५११ कलमे होती, तर नवीन भारतीय न्याय संहितेत ३५८ कलमे असतील. यामध्ये २१ नवीन गुन्ह्यांची भर पडली आहे. ४१ गुन्ह्यांमध्ये कारावासाच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. ८२ गुन्ह्यांच्या शिक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

भारतीय नागरिक संरक्षण संहिता –

अटक, तपास आणि खटला चालवण्याची प्रक्रिया सीआरपीसीनुसार होते. CrPC मध्ये ४८४ कलमे होती. आता भारतीय नागरिक संरक्षण संहितेत ५३१ कलमे असतील. १७७ कलमे बदलण्यात आली आहेत. ९ नव्या कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतीय साक्ष अधिनियम – 

भारतीय पुरावा कायद्यात १६७ कलमे होती. आता यांमध्ये १७० कलमे असतील. २४ कलमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दोन नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ कलमे रद्द करण्यात आली आहेत. खटल्यातील तथ्य कसे सिद्ध होईल, जबाब, साक्ष कसे नोंदवले जातील, हे सर्व भारतीय पुरावा कायद्यानुसार निश्चित केले जाते.

IPL_Entry_Point