मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गुजराती मुलानं कापला गृहमंत्र्याचा पतंग! अमित शहांनी केले असे काही की....! व्हिडिओ व्हायरल

गुजराती मुलानं कापला गृहमंत्र्याचा पतंग! अमित शहांनी केले असे काही की....! व्हिडिओ व्हायरल

Jan 16, 2024 10:37 AM IST

Home Ministar Amit shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मकरसंक्रांतीनिमित्त रविवारी त्यांच्या गावी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी एका तरुणाबरोबर पेच देखील लढवला. दरम्यान, या तरुणाने अमित शहा यांचा पतंग कापला असून हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

Home Ministar Amit shah
Home Ministar Amit shah

Home Ministar Amit shah : गुजरातचा पतंग महोत्सव हा जगभर प्रसिद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत अनेक बडे नेते आणि सेलिब्रिटींनी या महोत्सवात सहभागी होत पतंग उडवली आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद देखील लुटला. दरम्यान, शहा हे पतंग उडवत असतांना एका गुजराती तरुणाने त्यांचा पतंग कापला. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांचा दरारा सर्वश्रुत आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. अशा केंद्रीय गृहमंत्र्यांची पतंग एका सध्या तरुणाने कापली याची चर्चा सुरू आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यमिंट शहा हे रविवारी उत्तरायण पतंग महोत्सवादरम्यान गुजरातमध्ये पतंग उडवताना दिसले. अमित शाह पतंग उडवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक तरुण मुलगा अमित शाह यांच्या पतंग कापताना दिसत आहे. अमित शहा यांची पतंग कापल्यावर तरुण आनंदाने ओरडत असतांना दिसत आहे. दरम्यान, अमित शहा देखील या तरुणाला दाद देतांना या व्हिडिओत दिसत आहे.

Mumbai news : नायलॉन मांजाने केला घात! दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचा गळा कापल्याने मृत्यू; एक जखमी

अमित शहांचा पतंग कापण्यात मुलगा यशस्वी होताच, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी मुलाच्या नावाने जल्लोष केला. दरम्यान, व्हिडीओमध्ये अमित शाह देखील हसत हसत त्या मुलाला थम्ब्स अप दिला.

अमित शहा अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये उत्तरायण उत्सवात सहभागी झाले होते. या ठिकाणी त्यांनी पतंग उडवली. या सोबतच त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधला. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे सोशल मिडियावर शेअर करत अमित शाह यांनी इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "साबरमती विधानसभेच्या बहिणी आणि भावांसोबत आज उत्तरायण दिवशी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. उत्साहाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवी ऊर्जा देवो, असे अमित शहा यांनी केलेल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४

विभाग