Swiggy, BigBasket and Zomato: स्विगी, बिगबास्केट आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवर लवकरच बिअर, वाइनसारख्या कमी अल्कोहोलयुक्त दारूची होम डिलिव्हरी होऊ शकते. नवी दिल्ली, कर्नाटक, हरयाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ ही राज्ये यासाठी पथदर्शी प्रकल्पांचा विचार करत आहेत, असे इकॉनॉमिक टाइम्सने उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे. अधिकारी या निर्णयाचे फायदे-तोटे जाणून घेत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये दारूच्या होम डिलिव्हरीला परवानगी आहे.
महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगड आणि आसाममध्ये कोविड -१९ लॉकडाऊनदरम्यान मद्य वितरणास तात्पुरती परवानगी देण्यात आली होती. ऑनलाइन डिलिव्हरीमुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये मद्यविक्रीत २०-३० टक्के वाढ झाली आहे. पब चेन द बिअर कॅफेचे मुख्य कार्यकारी राहुल सिंह यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितले की, "दारूची ऑनलाइन होम डिलिव्हरी सक्षम करून, राज्ये ग्राहकांची सुविधा वाढवू शकतात, आर्थिक विकासाला चालना देऊ शकतात आणि जबाबदार आणि नियंत्रित अल्कोहोल वितरण सुनिश्चित करताना जागतिक ट्रेंडशी जुळवून घेऊ शकतात."
मद्यपान करण्यासाठी शासनाकडून परवानगी मिळते. मात्रस त्यालाही काही निर्बंध आहेत. ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी असणारी माइल्ड बियर, बिझर पिण्यासाठी २१ वर्ष असणे गरजेचे आहे. बिझरमध्ये अल्कोहोल नसते, असे अनेकजण म्हणतात. पण, त्यातही ४.८ टक्के अल्कोहोल असते. मद्यपान करण्यासाठी २५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असणे गरजेचे आहे. पण त्यासाठी मद्यसेवन परवाना गरजेचा असतो. तो नसेल तर तुम्ही अधिकृतरित्या मद्यपान करू शकत नाही.
अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने इतर आजारांना बळी पडू शकता. याशिवाय, रक्तदाब वाढतो. ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका असतो. याचबरोबर पचनशक्ती पचनशक्ती आणि मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो. २०२० च्या अभ्यासानुसार, अल्कोहोलचे सेवन व्यक्तीच्या डोपामाइन आणि सरोटोनिनच्या स्तरांवर परिणाम करते. जसजसे दारूचे सेवन वाढते तसतसे व्यसनाची पातळी वाढते. या व्यसनावर मात करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी वर्तणूक थेरपी हा प्रभावी उपचार समजली जाते. दारू पिण्याची गरज किंवा लालसा कमी करण्यासाठी औषधांची शिफारस केली जाते. अचानक मद्यपान सोडल्याने शरीरात मोठे चढउतार होतात. त्यावर योग्य उपचार न केल्यास गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
संबंधित बातम्या