पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे केरळमधील नागरिकांना वाढत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तिरुअनंतपुरममध्ये पाणी पुरवठा बाधित झाल्याने शैक्षणिक संस्थांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मेलारुनूर येथील मुख्य पारेषण वाहिनीतील बिघाडामुळे गेल्या चार दिवसांपासून ४० प्रभागांतील घरे व व्यावसायिक आस्थापनांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. केरळ जल प्राधिकरणाचा (केडब्ल्यूए) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गेल्या चार दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिरुवनंतपुरम-नागरकोइल रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे पाण्याच्या पाईपलाईनचे अलाइनमेंट बदलण्याचे काम सुरू आहे.
सोमवारी सकाळपासून पेयजलाचे पंपिंग सुरू झाले मात्र जिल्हा प्रशासनाने शहरातील शाळांसह सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी शाळांमध्ये होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारपर्यंत कोचीतील अनेक भागांत पाणी पुरवठा सुरुळित झाला मात्मिर उंचावरील भागात अजूनही पाणीपुरवठा पूर्ववत झालेला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना युवक काँग्रेस आणि केएसयूने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.
दुरुस्तीला गुरुवारपासून सुरुवात झाली असून ४८ तासांत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु स्लुईस व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने राजधानीच्या मोठ्या भागात पाणी पोहोचू न शकल्याने हे काम लांबले आहे. महापालिका आणि केडब्ल्यूएतर्फे रविवारी दिवसभर टँकर चालविण्यात आले, मात्र पुरवठा पूर्ण होऊ शकला नाही. राज्याचे जलसंपदा मंत्री रोशी ऑगस्टीन यांनी सांगितले की, याची चौकशी केली जाईल. चार दिवसांहून अधिक काळ पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात दिरंगाई झालेल्या गळतीला जबाबदार कोण, याचा शोध घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.
रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीने झोपेत असताना नकळत श्वास घेतला. या श्वासासोबत एक झुरळ त्याच्या नाकात गेलं. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या नाकात काहीतरी रेंगाळत असल्याचं त्याला जाणवलं आणि मग ते त्याच्या घशातून खाली सरकताना त्याला जाणवलं.
दुसऱ्या दिवशी त्याने या संपूर्ण गोष्टीकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, काही वेळाने त्याला त्रास होऊ लागला. व त्याच्या श्वासातून दुर्गंधी येऊ लागली. असे असतांनाही त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. तीन दिवसांनंतरही त्याच्या श्वासातून भयंकर दुर्गंध येत असल्याचं व तोंडातून पिवळी थुंकी व खोकला येऊ लागल्याचं त्याला जाणवलं. ऑपरेशन दरम्यान ब्रॉन्कसमध्ये पंख असलेले काहीतरी स्पष्टपणे दिसले. हे झुरळ असल्याचं निष्पन्न झालं. झुरळ हे कफमध्ये अडकले होते. डॉक्टरांनी त्याला बाहेर काढल्यावर रुग्णाला बरं वाटू लागलं.