Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो ग्रेटर नोएडामधील असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये काही मुलांनी आपल्याच मित्रांसोबत असे वर्तन केले की, त्याला याची आठवण आयुष्यभर होत राहील. प्रकरण ग्रेटर नोएडा वेस्टमधील हाई राइज सोसायटीमधील आहे. येथे सोसायटीच्या आतमध्ये होळीच्या जल्लोषात काही मुलांनी आपल्या मित्राला होळीमध्ये फेकले आहे. यामध्ये पीड़ित मुलाचे पाय गंभीररित्या भाजले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. यामध्ये दिसते की, मुले कशाप्रकारे मुलाला होळीत फेकत आहेत.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दिसते की, सोसायटीत होळिका दहन केले जात आहेत. यावेळी लोकांची गर्दीही दिसत आहे. अचानक काही मुलांनी गंमत करण्याचा मूड झाला व त्यांनी आपल्या मित्राला टांगला. सुरुवातीला वाटले की, सर्वचण गंमत करत आहेत. मात्र त्यांनी मागचा पुढचा विचार न करता मुलाला होळीमध्ये फेकले. मुलाला भाजल्याने चरफडत होता. लोकांना ही घटना समजताच त्यांनी मुलाला आगीतून बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार गा व्हिडिओ गौरसिटी गॅलेक्सी १ मधील असल्याचे सांगितले जात आहे.काही मुलांनी खोडी करत आपल्याच मित्राला जळत्या होळीत टाकले. मुलाचे दोन्ही पाय भाजले आहे. सर्व लोक होळीच्या रंगात न्हाऊन होळी खेळत होते. त्यावेळी ही घटना घडली. जळालेली होळी काही प्रमाणात विझली होती. अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती.
संबंधित बातम्या