विमान कंपन्यांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे सत्र सुरूच..! आज तीन एअर लाईन्स कंपन्यांच्या ५० विमानांना लक्ष्य
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  विमान कंपन्यांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे सत्र सुरूच..! आज तीन एअर लाईन्स कंपन्यांच्या ५० विमानांना लक्ष्य

विमान कंपन्यांना बॉम्ब स्फोटाच्या धमकीचे सत्र सुरूच..! आज तीन एअर लाईन्स कंपन्यांच्या ५० विमानांना लक्ष्य

Oct 27, 2024 07:56 PM IST

रविवारी ५० विमानांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या. गेल्या दोन आठवड्यांत ३५० हून अधिक विमानांना अशाच प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागले असून, बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Hindustan Times)
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Hindustan Times)

तीन एयरलाइन्स कंपन्यांच्या ५० विमानांना रविवारी बॉम्ब स्फोटाने उडवण्याची धमकी मिळाली. यामध्ये इंडिगोची १८ , विस्तारा च्या १७ आणि अकासा एअरलाईन्सची १५ विमानांचा समावेश आहे. गेल्या १४ दिवसात ३५० हून अधिक डोमॅस्टिक आणि इंटरनॅशनल फ्लाइट्समध्ये बॉम्ब स्फोट करण्याची धमकी मिळाली आहे. मात्र याचा तपास केल्यानंतर या धमक्या केवळ अफवा असल्याचे समजले आहे. मागील काही दिवसांपासून विमानात बॉम्ब असल्याच्या धमक्यांमुळे विमानसेवा प्रभावित झाली आहे. यामुळे ६०० कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

तीन भारतीय विमान कंपन्यांच्या किमान ५० विमानांना रविवारी बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या. गेल्या दोन आठवड्यांत ३५० हून अधिक विमानांना अशाच प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागले असून, बहुतांश धमक्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

रविवारी अकासा एअरने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या १५ विमानांना सुरक्षेचा इशारा देण्यात आला आहे. सखोल तपासणीनंतर सर्व विमानांना उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली. इंडिगोला १८ विमानांसाठी धमक्या मिळाल्या आहेत, तर विस्ताराला १७ विमानांचा अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने या धमक्यांचे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आयटी मंत्रालयाने २६ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शन तत्वे जारी करत सोशल मीडिया प्लेटफॉर्म्संना सूचना दिल्या होत्या की, अशा अफवा तत्काळ हटवाव्यात. तसे न केल्यास त्यांच्यावर आयटी एक्टनुसार मिळणारी इम्युनिटी रद्द केली जाईल. मंत्रालयाने म्हटले की, अशी माहिती तत्काळ हटवून याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. 

बॉम्ब स्फोटाच्या धमक्यांपासून सुरक्षेसाठी  केंद्र सरकार पावले उचलत असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी रविवारी केली. त्यांनी सांगितले की, रोखण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय यंत्रणा, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा, इंटेलिजन्स ब्युरो यांचीही मदत घेत आहोत. आम्ही दोन नागरी हवाई वाहतूक कायद्यांमध्ये बदल करण्याची योजना आखत आहोत. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि दंड ठोठावण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना विमान प्रवासावर बंदी घालण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. येत्या काही दिवसांत आम्ही त्यांची घोषणा करू, असे ते म्हणाले.

वाढत्या धमक्यांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना माहिती तंत्रज्ञान नियमांच्या अनुषंगाने चुकीची माहिती त्वरित काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. ही धमकी गांभीर्याने घेत सरकारने या फसवणुकीमागची ओळख पटवण्यास सुरुवात केली असून मेटा आणि एक्ससह सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना अशा संदेशांशी संबंधित डेटा हटवण्याची सुचना दिल्या आहे. 

या अहवालात म्हटले आहे की, फसव्या धमक्यांसाठी जबाबदार असलेल्या काही व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे, परंतु त्यांची ठिकाणे आणि ओळखीबद्दल तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर