भारतात HMPV रुग्णांची संख्या वाढली! तीन राज्यात आढळले ७ रुग्ण; सरकार म्हणतं…' चिंता नाही'
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  भारतात HMPV रुग्णांची संख्या वाढली! तीन राज्यात आढळले ७ रुग्ण; सरकार म्हणतं…' चिंता नाही'

भारतात HMPV रुग्णांची संख्या वाढली! तीन राज्यात आढळले ७ रुग्ण; सरकार म्हणतं…' चिंता नाही'

Jan 07, 2025 07:34 AM IST

HMPV Virus: भारतात एचएमपीव्ही रुग्णांची संख्या ७ झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच चिंता करण्याची गरज नाही. 'एचएमपीव्ही हा नवा विषाणू नाही.

भारतात HMPV रुग्णांची संख्या वाढली! तीन राज्यात आढळले ७ रुग्ण; सरकार म्हणतं…' चिंता नाही'
भारतात HMPV रुग्णांची संख्या वाढली! तीन राज्यात आढळले ७ रुग्ण; सरकार म्हणतं…' चिंता नाही' (Pixabay)

HMPV Virus: भारतात एचएमपीव्ही म्हणजेच ह्युमन मेटान्यूमोव्हायरसचे रुग्णांची संख्या  हळू हळू वाढत आहे.  देशात आतापर्यंत ७  जण या व्हायरसला बळी पडले आहेत. आतापर्यंत तीन राज्यांमध्ये एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. या विषाणूच्या रुग्णवाढीमुळे कोव्हिडसारखी परिस्थिती निर्माण होणार नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. नेदरलँड्समध्ये २००१ साली पहिल्यांदा हा विषाणू आढळला होता.

कुठे आढळले रुग्ण 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी भारतात एचएमपीव्हीचे ७  रुग्ण आढळले. यामध्ये बेंगळुरू, नागपूर आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी दोन तर अहमदाबादमध्ये एक रुग्ण आढळला आहे. आयसीएमआरने बेंगळुरूच्या बॅप्टिस्ट रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याचे स्पष्ट केलं. तर पहिला रुग्ण बेंगळुरू येथे आढळला. येथे ३  वर्षीय मुलीचा या विषाणूची लागण झाल्याचे उघड झालं आहे. या मुलीला ताप आणि सर्दी झाली होती. त्यामुळे तिला डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती मुलगी आता  बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुसरा रुग्ण ३  जानेवारी रोजी आढळला होता. ज्यात ८  महिन्यांच्या बाळाला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं होतं. दोन्ही मुलांना यापूर्वी ब्रॉन्को न्यूमोनियाची लागण झाली होती. तसेच त्यांनी  परदेशात देखील  प्रवास केला नव्हता. राजस्थानमधील डुंगरपूर येथील दोन वर्षांच्या मुलाला २४  डिसेंबर रोजी अहमदाबादयेथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६  डिसेंबर रोजी त्याला एचएमपीव्हीचीची लागण झाल्याचे स्पष्ट झालं. ७  आणि १३  वर्षांच्या या दोन मुलांना ३ जानेवारी रोजी नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विशेष म्हणजे नागपूर महापालिकेने एम्समध्ये या रुग्णांचे नमुने  पुन्हा तपासण्याचा निर्णय  निर्णय घेतला होता. दोन्ही मुले बरी झाली आहेत. तामिळनाडूच्या आरोग्य सचिव सुप्रिया साहू यांनी सांगितले होते की, राज्यात २  अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यांच्यावर चेन्नई आणि सालेम येथे उपचार सुरू आहेत.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात.…

केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी सोमवारी सांगितले की, सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच  चिंता करण्याची गरज नाही. ते म्हणाले की एचएमपीव्ही हा नवीन विषाणू नाही आणि देशात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू रोगजंतूमध्ये वाढ दिसून आलेली नाही. नड्डा यांनी एक व्हिडिओ जारी करत म्हटलं की, चीनमध्ये एचएमपीव्हीच्या ताज्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, देशातील सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्था आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) चीन आणि इतर शेजारी देशांमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

डब्ल्यूएचओने या परिस्थितीची दखल घेतली असून लवकरच या विषाणू बद्दलची आणखी माहिती आम्हाला दिली जाईल. नड्डा म्हणाले की, आयसीएमआर आणि इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हेलन्स प्रोग्रामकडे उपलब्ध श्वसन विषाणूंच्या देशातील माहितीचा देखील आढावा घेण्यात आला आहे.  भारतात कोणत्याही सामान्य श्वसन विषाणू बाधित व्यक्तिंमध्ये वाढ दिसून आलेली नाही. देशातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून काळजी करण्याचे कारण नाही, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, असे नड्डा म्हणाले. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर