गाझियाबादच्या लोणी मतदारसंघातील भाजपचे आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी हिंदूंना दर्ग्यात न जाण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले हिंदूंनी दर्ग्यात नतमस्तक होणे टाळावे, कारण तेथे जिहादी दफन केले जातात. मंदिरात प्रवेश करणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्याची शिफारसही त्यांनी केली आहे. गुर्जर यांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
छपरौली येथे बुधवारी रात्री एका कार्यक्रमा दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना लोणी मतदारसंघाचे आमदार म्हणाले की, जिथे असा जिहादी मेलेला असतो, दफन केला जातो आणि तिथे जाऊन एखादा हिंदू डोकं टेकवतो, तर यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही.
गुर्जर पुढे म्हणाले, 'खातू श्यामजींपासून जिथे माणसाला जायचे असेल तिथे आपण जाऊ शकतो, कारण देव एक आहे, त्याची रूपे अनेक आहेत. पण दर्ग्याच्या आत त्या जिहादींना दफन केले जाते, ज्या जिहादींनी येथे गैरवर्तन केले, त्यांनी मुलींना जौहर करण्यास भाग पाडले. ते तिथेच गाडले जातात, त्यांच्या आत किडे पडलेले असेल, त्यावर जर कोणी डोकं टेकत असेल तर यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही.
माझ्या मतदारसंघातील ज्यूसच्या दुकानात लघवी मिसळली गेली. असे लोक कलवा बांधून मंदिरात जातात आणि तिथे जाऊन टीळा लावून लव्ह जिहाद करतात. अशा तऱ्हेने ज्यांना संशय आहे, त्यांनी त्यांची तपासणी करावी, असे आमच्या विधानसभेतील कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. त्यांना बघा, जर त्यांना मंत्र पठण करता येत असेल तर ठीक आहे, जर त्यांनी मंत्र पठण केले नाही तर त्यांना आत नेऊन त्यांची खतना झाली आहे की नाही, हे तपासा. जर ते टिळा लावून मंदिरात प्रवेश करत असतील तर ते नक्कीच दोषी आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल.
अरब देशांतील लोक भगवान शंकराची पूजा करतात, असा दावाही गुर्जर यांनी केला. ते म्हणाले की, 'मौलवीही एक दिवस महादेवाची पूजा करतील. तसेच मंदिरात प्रवेश करणाऱ्या संशयित व्यक्तींची तपासणी करण्याचा सल्लाही आमदारांनी दिला.