मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  पर्यटनासाठी आलेल्या कोरियन तरुणींविरोधात टोळक्याची घोषणाबाजी; मेरठ विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

पर्यटनासाठी आलेल्या कोरियन तरुणींविरोधात टोळक्याची घोषणाबाजी; मेरठ विद्यापीठातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 23, 2023 01:02 PM IST

Meerut Crime News Marathi : विद्यापीठात विदेशी तरुणी धर्मांतर करत असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी कोरियन तरुणींसमोर जोरदार घोषणाबाजी केल्याची घटना समोर आली आहे.

Korian Girls In Chaudhary Charan Singh University Meerut
Korian Girls In Chaudhary Charan Singh University Meerut (HT)

Korian Girls In Chaudhary Charan Singh University Meerut : पर्यटनासाठी आलेल्या कोरियन तरुणींवर धर्मांतरणाचा आरोप करत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील मेरठच्या चौधरी चरणसिंह विद्यापीठात ही घटना घडली असून त्यानंतर पोलिसांनी तरुणांची तातडीनं दिल्लीत रवानगी केली आहे. या प्रकरणामुळं विद्यापीठात मोठा तणाव निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील खार परिसरात एका कोरियन तरुणीसोबत गैरवर्तन करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता मेरठमध्ये कोरियन तरुणींसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्यामुळं विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियातून दोन तरुणी भारतात फिरण्यासाठी आल्या होत्या. दिल्लीत आल्यानंतर त्यांनी मेरठमधील चौधरी चरणसिंह विद्यापीठाला भेट देण्याचं ठरवलं. त्यानंतर या विदेशी तरुणी विद्यापीठात दाखल होताच हिंदू संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. कोरियन तरुणी धर्मांतरणासाठी विद्यापीठात आल्याचा आरोप करत तरुणांच्या टोळक्यानं कोरियन तरुणींसमोर घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रकरणात हस्तक्षेप करत प्रकरण मिटवलं. त्यानंतर कोरियन तरुणींना दिल्लीत पाठवण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

कोरियन तरुणी या मेरठमधील विद्यापीठात फिरण्यासाठी आल्या होत्या. परंतु काही तरुणांनी धर्माचा मुद्दा समोर करत त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. विदेशी तरुणी धर्मप्रसार करण्यासाठी विद्यापीठात आल्याचा दावा संपूर्ण खोटा असल्याचं मेरठ पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. परंतु या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कुणाविरोधातही गुन्हा दाखल केलेला नाही, त्यामुळं आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

IPL_Entry_Point