India-Canada dispute: खलिस्तानी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यात निर्माण झालेला तणाव आता समाजातही कटुता निर्माण करत आहे. निज्जर यांच्या हत्तेमागे भारत असल्याचा आरोपी ट्रूडू यांनी केल्यावर खलिस्तान वाद्यांचे मनोबल उंचावले असून त्यांनी आता थेट भारताला धमकावन्यास सुरुवात केली आहे. खलिस्तानी संघटना सीक फॉर जस्टिसने कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिली आहे.
खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. निज्जरच्या हत्तेत भारतीय गुप्तचर संघटनांचा हात असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी केल्यावर भारताने कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी केली. ट्रूडो सरकार कॅनडातील आपली कमकुवत स्थिती खलिस्तानी समर्थकांच्या माध्यमाने बळकट करत निवडणूक जिंकण्याच्या प्रयत्नात भारत कॅनडा संबंधांची आहुती देत आहेत.
ट्रूडो यांच्या वक्तव्यामुळे आता खलिस्तानी पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी आता कॅनडा येथील हिंदू नागरिकांना धमकावन्यास सुरुवात केली आहे. खलिस्तान वाद्यांच्या धमकीनंतर हिंदू समाजातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हरदीप निउजेर आणि खलिस्तानी अतिरेकी गुरपतवान सिंग यांचा जवळचा सहकारी भारतीय हिंदूंना कानडा कोड गो बॅक टू इंडिया अशी धमकी देतांना दिसत आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ मध्ये धमकावण्यात आले आहे की, कॅनडामध्ये राहणारे हिंदू हे फक्त भारताचे समर्थन करत नाही तर खलिस्तान समर्थक शिखांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दाबण्याचेही समर्थन करत आहेत. खलिस्तानी निज्जरचा खून झाल्यावर हिंदूंनी आनंद साजरा केला. त्यामुळे हिंसाचार फोफावला असंही ते म्हणाले. या व्हिडिओमुळे कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कॅनडातील एका हिंदू संघटनेचे प्रवक्ते विजय जैन म्हणाले, 'ट्रूडो यांच्या भूमिकेमुळे कॅनडामध्ये हिंदूफोबिया वाढला आहे.' जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, आता जे वातावरण निर्माण झाले आहे त्यात कॅनडात राहणाऱ्या हिंदूंच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी असा प्रकार १९८५ मध्ये घडला होता.
संबंधित बातम्या