हिमाचलमधील काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं, 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांचा राजीनामा मागे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  हिमाचलमधील काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं, 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांचा राजीनामा मागे

हिमाचलमधील काँग्रेस सरकारवरचं संकट टळलं, 'ऑपरेशन लोटस' फेल; विक्रमादित्य यांचा राजीनामा मागे

Feb 28, 2024 11:07 PM IST

Himachal Pradesh Political Crisis : काँग्रेसने आपले हिमाचलमधील सरकार वाचवण्यात यश मिळवले आहे. दिवसभरातील घडामोडीनंतर नाराज नेते विक्रमादित्य सिंह यांना आपला राजीनामा मागे घेत सरकारला काही धोका नसल्याचे म्हटले आहे.

Himachal Political Crisis
Himachal Political Crisis

Himachal Political Crisis: हिमाचल प्रदेशमधील मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू (Sukhvinder Singh Sukhu) यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी झाले आहे. नाराज आमदार विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. त्याचबरोबर राज्याचा अर्थसंकल्पही मंजूर करण्यात आला आहे. काँग्रेस नेते विक्रमादित्य सिंहयांनी हिमाचल प्रदेशच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रपदाचा राजीनामा मागे घेतला आहे.

विक्रमादित्य सिंह यांनी आपला राजीनामा मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना तेम्हणाले की, संघटना मजबूत करणे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. पक्षाच्या व्यापक हितासाठी आणि एकात्मतेसाठी मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला. आता मलाही हे प्रकरण आणखी वाढवायचे नाही. आता आमच्या सरकारला कोणताही धोका नाही.

राज्यसभा निवडणुकीत पक्षविरोधी मतदान करणाऱ्या सहा बंडखोर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे मुख्य व्हीप हर्षवर्धन चौहान यांनी सांगितले की, सहा बंडखोर आमदारांची हकालपट्टी करण्याचा प्रस्तावसभापतींकडे सादर केला आहे. यावर सुनावणी झाली असून दोन्ही बाजूंच्या वकिलांनी त्यांचे युक्तिवाद सभापतींसमोर मांडले आता सभापती त्यावर लवकरच निर्णय घेतील.

हिमाचल मंत्रिमंडळातील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी बुधवारी सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा जाहीर करताना त्यांनी आपल्या वडिलांची तुलना शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्याशी केली. पत्रकार परिषदेत वडिलांची आठवणीत विक्रमादित्य भावूक झाले. संपूर्ण निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली. ज्या व्यक्तीमुळे हिमाचलमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले, त्यांचा पुतळा बसवण्यासाठी शिमल्यातील मॉल रोडवर २ यार्ड जमीन देण्यात आली नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असं ते म्हणाले होते. मात्र काँग्रेसने त्यांची नाराजी दूर करण्यात यश मिळवले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर