हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान काँग्रेसने म्हटले आहे की, सर्वकाही ठीक असून सरकारला कोणताही धोका नाही. त्यातच मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूयांनी सोमवारीमोठी घोषणा केली आहे. राज्यातील महिलांना आता प्रत्येक महिन्याला राज्य सरकार १५०० रुपयांची मदत देणार आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी याची माहिती आपल्या 'एक्स' हँडलवरून दिली आहे. त्यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, राज्यातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व माता-भगिनींना या आर्थिक वर्षापासून प्रतिमहिना १५०० रुपये दिले जातील.
मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, या योजनेचा लाभ राज्यातील जवळपास पाच लाख महिन्यांना लाभ मिळेल. यासाठी राज्य सरकार प्रत्येक महिन्याला ८०० कोटी रुपये खर्च करणार आहे. हिमाचल प्रदेशमधील महिलांना ही रक्कम ‘इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सम्मान निधी’ योजनेच्या माध्यमातून दिली जाईल.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीच्या आधी ही योजना काँग्रेसच्या सर्वात मोठ्या गँरेंटीपैकी एक होती. काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यापूर्वी हे आश्वासन दिले होते. त्यावेळी कोणत्याही अटीविना प्रत्येक महिलेला १ हजार ५०० रुपये देण्याचे आश्वान दिले होते. राज्यात महिलांची संख्या जवळपास २३ लाख आहे. मात्र आता सरकारने यासाठी वयोमर्यादा निश्चित केली आहे. १८ ते ९० वर्षे वयाच्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
नियमानुसार आता हिमाचल प्रदेशातील जवळपास ५ लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांनी म्हटले की, या योजनेसाठी महिलांकडून फॉर्म भरून घेतले जातील. १ एप्रिलपासून या योजनेचा लाभ सुरू होईल.
सुक्खू यांनी सांगितले की,विधानसभानिवडणुकीत काँग्रेसने जनतेला १० मोठी आश्वासने दिली होती. यातील पाच आश्वासने पूर्ण केली आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली आहे. यामुळे राज्यातील १.६ कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे.
संबंधित बातम्या