mosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले, पोलिसांशी झटापट-himachal pradesh mosque row hindu outfit scuffle with police in kullu ,देश-विदेश बातम्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  mosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले, पोलिसांशी झटापट

mosque row : हिमाचलमध्ये आणखी एका मशिदीवरून वाद; कुल्लूमध्ये हजारो हिंदू एकवटले, पोलिसांशी झटापट

Sep 30, 2024 06:09 PM IST

हिमाचल प्रदेशात एकापाठोपाठ एक मशिदीवरून गदारोळ सुरू आहे. शिमल्यापाठोपाठ आता कुल्लूमध्येही हिंदू संघटनांनी मशीद बेकायदा ठरवून पाडण्याची मागणी केली आहे.

कुल्लूमध्ये हिंदू संघटनेचे आंदोलन.
कुल्लूमध्ये हिंदू संघटनेचे आंदोलन.

हिमाचल प्रदेशात एकापाठोपाठ एक मशिदीवरून गदारोळ सुरू आहे. सिमल्यापाठोपाठ आता कुल्लूमध्येही हिंदू संघटनांनी मशीद बेकायदा ठरवून पाडण्याची मागणी केली आहे. सोमवारी मंदिरापासून मशिदीपर्यंत मोर्चाही काढण्यात आली. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापटही झाली. दरम्यान, राज्यातील एकही मशीद बेकायदा नसून नकाशा मंजूर होण्यास उशीर होत असल्याने अडचणी येत असल्याचे एका मुस्लिम संघटनेने म्हटले आहे.

हिंदु धर्म जागरण यात्रेअंतर्गत काढण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो लोक सहभागी झाले होते. हनुमान मंदिर ते आखाडा बाजारातील जामा मशिदीपर्यंत कडक बंदोबस्तात मोर्चा काढण्यात आली. आंदोलकांच्या हातात भगवे झेंडे, पोस्टर्स आणि बॅनर होते. या आंदोलनात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत महिला सहभागी झाल्या होत्या मोर्चामध्ये वाद्येही वाजवण्यात आली.

आंदोलकांनी घोषणाबाजी करत मशीद बेकायदा असल्याचा आरोप करत ती जमीनदोस्त करण्याची मागणी केली. मोर्चामध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. या झटापटीत कोणीही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही. या आंदोलनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हिमाचलमधील मशिदीचा वाद शिमलाच्या संजौली या उपनगराशी झालेल्या भांडणानंतर सुरू झाला. येथे सलून चालवणाऱ्या एका मुस्लीम तरुणाचे एका हिंदू व्यावसायिकाशी भांडण झाले होते. ३० ऑगस्ट रोजी झालेल्या भांडणानंतर आरोपी मशिदीत लपून बसल्याचा आरोप आहे. त्यानंतर मशिदीचा मोठा भाग बेकायदा असल्याचा दावा स्थानिकांनी केला.  हिंदू संघटना ते पाडण्याची मागणी करत आहेत. यानंतर एकापाठोपाठ एक राज्यातील अनेक मशिदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. 

मुस्लिम कल्याण समिती मंडीचे प्रमुख नईम अहमद यांनी सोमवारी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील कोणतीही मशीद बेकायदेशीर नाही, परंतु नकाशे मंजूर करण्यास आणि इतर प्रक्रियेस विलंब होत आहे. बेकायदा आढळल्यास आम्ही स्वत: ही वास्तू हटवू. ते म्हणाले की, रविवारी मंडीच्या बल्ह भागात मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. अल्पसंख्याक समाजाची राज्यस्तरीय समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील परिस्थितीची माहिती देईल, असा निर्णय घेण्यात आला.

अहमद म्हणाले की, मुस्लिम नेत्यांचा असा विश्वास आहे की काही लोक द्वेष पसरवत आहेत आणि ते थांबले पाहिजे. इतर राज्यातून येणाऱ्या सर्व लोकांची, मग ती कोणत्याही धर्माची असो, तपासणी करण्यात यावी. कुल्लू जिल्हा प्रशासनाने रविवारी सांगितले की, आखाडा बाजारात असलेली मशीद बेकायदेशीर नाही. सरकारी नोंदी आणि मशिदीने व्यापलेल्या जागेत काही प्रमाणात तफावत असल्याचे सांगण्यात आले. हे प्रकरण नगररचना विभागाकडे प्रलंबित आहे.

Whats_app_banner