Bhihar Lover news: बिहारच्या जमुईमध्ये एका प्रेमी युगुलाचा हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. टिळा आणि हळदी समारंभानंतर प्रेयसीने पळून जाऊन थेट प्रियकरासोबत पळून जाऊन मंदिरात प्रेमविवाह केला. या बाबत पोलिसांत तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पकडले. मात्र, दोघांनीही भर रस्त्यात एकमेकांना घट्ट मिठी मारली. दोघांनाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेणार होते. पोलिसांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी एकमेकांना ऐवढी घट्ट मिठी मारली होती की पोलिसांना देखील त्यांना एकमेकांपासून दूर करतांना नाकी नऊ आले. यावेळी दोन्ही कुटुंबांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.
पालकांनी दोन्ही मुलांना प्रेमाने वाढवले होते. मुलीच्या वडिलांनी तिचा विवाह दुसऱ्या एका मुलाशी लावून दिला होता. टिचे लग्न मोठ्या थाटामाटात लावून देण्याची तयारी देखील घरच्यांनी केली होती. चांगली नोकरी करणाऱ्या मुलाशी मुलीचे लग्न ठरवण्यात आले. मुलाच्या घरी जाऊन सर्व विधी पार पाडल्यानंतर त्यांनी ११ मार्च ही लग्नाची तारीख निश्चित केली होती. दरम्यान, घरचे मुलीच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होते.
लग्नासाठी घरात मांडव देखील उभारण्यात आला. मुलीचा टिळा आणि हळदी समारंभ पार पाडला. मात्र, मुलीने काल रात्री अचानक घरातून पळून जाऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. मुलगी घरी न दिसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. त्यांनी बऱ्हाट पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून बऱ्हाट पोलिस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही प्रियकराच्या घरातून शोधून बाहेर काढले.
बरहाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दधा गावात ही घटना घडली. रविवारी गावात एका प्रेमप्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उमेश यादव, वडील उपेंद्र यादव पोलिस स्टेशन हद्दीतील धुनियामरण गावचे, तर प्रेयसी वर्षा कुमारी ही तेतारिया गावातील रहिवाशी आहे. दोघांचेही एकमेकांवर प्रेम होते. मात्र, मुलीचे लग्न तिच्या वडिलांनी लावून देणार होते. यामुळे मुलगी पळून प्रियकरांकडे पळून गेली होती. दरम्यान, प्रियकर आणि प्रेयसीने पळून जाऊन लग्न देखील केले. पोलिसांनी मोठ्या कष्टाने या जोडप्याला शांत करून पोलीस ठाण्यात आणले. येथे तरुणीने आपण प्रौढ असल्याचे सांगून प्रियकरसोबत राहण्याचा आग्रह धरला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या निर्णयावर ठाम राहिली. रात्री उशिरापर्यंत हे नाट्य सुरूच होते.
मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात सांगितले की, त्यांनी मुलीसाठी काम करणारा मुलगा शोधून तिचे लग्न ठरवले आहे. तसेच तिचे लग्न देखील ठरवण्यात आले आहे. जर मुलीला त्या मुलाशी लग्न करायचे नसेल तर दूसरा चांगला नोकरी करणाऱ्या मुलाशी ते मुलाचे लग्न लावून देण्यास तयार होते. मात्र, बेरोजगार असणाऱ्या तिच्या प्रियकराशी ते मुलीचे लग्न लावून देण्यास टायर नव्हते. दरम्यान, पोलिस ठाण्यात तरुणीची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र ती तिच्या निर्णयावर होती.
यासंदर्भात बऱ्हाट पोलीस ठाण्याचे प्रभारी कुमार संजीव यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गावात पोहोचून दोघांनाही पोलीस ठाण्यात आणले. मात्र प्रकरण प्रेमप्रकरणातून लग्नाचे ठरले आहे. दोघेही प्रौढ आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अर्ज फसवणुकीची तक्रार दिलेली नाही.