मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Hero Splendor Plus Sports Edition किलर लूकसह आता महागड्या स्पोर्ट्स बाईक्सना देणार टक्कर..

Hero Splendor Plus Sports Edition किलर लूकसह आता महागड्या स्पोर्ट्स बाईक्सना देणार टक्कर..

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2023 05:26 PM IST

Hero Splendor Plus : हिरो कंपनीने आपल्या सर्वाधिक खपाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीचे स्पोर्ट्स व्हर्जन बाजारात आणले आहे. जाणून घ्या किंमत, फिचर्स व अन्य वैशिष्ट्ये

Hero Splendor Plus Sports Edition 
Hero Splendor Plus Sports Edition 

Hero Splendor Plus Sports Edition आता पुन्हा एकदा 100cc सेगमेंटच्या मोटारसाईकल निर्माता कंपन्यांची धडधड वाढवायला येत आहे स्प्लेंडर प्लस स्पोर्ट्स एडिशन. त्याचा स्पोर्टी लूक पाहून तुम्हीही बाईकच्या प्रेमात पडाल. हिरो स्प्लेंडर आपल्या दमदार इंजिन व अधिक  माइलेजसाठी ओळखले जाते. देशात सर्वाधिक विक्री होणार मोटारसायकल असणारी हिरो स्प्लेंडर आता नव्या अवतारात येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, हिरो स्प्लेंडर स्पोर्ट्स एडिशन नव्या फीचर्ससह लाँच केली जाईल. 

ट्रेंडिंग न्यूज

हीरो स्प्लेंडर अनेक वर्षापासून लोकांची पहिली पसंत आहे. दमदार इंजिन, कमी कीमत आणि अधिक माइलेज हे तिन्ही गुण या बाइकमध्ये मिळतात. कंपनीने या बाईकची मागणी लक्षात घेऊन ग्राहकांना खुश करण्यासाठी आता Hero Splendor Plus Sports  मध्ये नवीन अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे.

डिजाइन आणि लुक बाबत बोलायचे झाल्यास हीरो स्प्लेंडरचे डिजाइन आणि लुक्स सध्याच्या हीरो स्प्लेंडरप्रमाणेच असेल. मात्र या स्पोर्ट एडिशनमध्ये अनेक अत्याधुनिक व स्मार्ट फीचर पाहायला मिळतील. जसे डिजिटल कंसोल, ब्लूटूथ कनेक्टिविटी, यूएसबी चार्जिंग पोर्ट आणि रियर टाइम मायलेज रीडआउट, त्याचबरोबर साइड स्टँड इंजन, कटऑफ आणि कॉल, एसएमएस अलर्ट सारख्या अनेक सुविधा Hero Splendor Plus Sports Edition मध्ये उपलब्ध असतील. 

Hero Splendor Plus Xtec बाइकच्या अन्य वैशिष्ट्यांमध्ये फ्रंटमध्ये टेलिस्कोपिक हायड्रोलिक शॉक एब्जॉर्बर आणि रियरमध्ये ५-स्टेप एडजस्टेबल हाइड्रोलिक शॉक एब्जॉर्बर, १३० मिमी फ्रंट आणि रियर ड्रम ब्रेक, ट्यूबलेस फ्रंट आणि रियर टायर, ९.८-लीटर फ्यूल टँक सारखे फिचर्स आहेत. यामध्ये तुम्हाला कलर पर्याय दिले गेले आहेत. हीरो स्प्लेंडर प्लस एक्सटेक बाईकला चार रंगात लाँच केले आहे. त्यामध्ये टॉरनेडो ग्रे, स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनवस ब्लॅक आणि पर्ल व्हाइट कलर सामील आहे. ही एडिशन नवीन म्हणजे २०२३ मधील स्पोर्ट एडिशन आहे.

WhatsApp channel

विभाग